गांधीनगर (गुजरात) – तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवल्यानंतर काबुलमध्ये असणार्या भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांना सुरक्षितरित्या भारतात आणण्यात आले. भारतीय वायूदलाच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या विमानातून या सर्वांना आणण्यात आले. यात राजदूतांसमवेत १२० जणांचा समावेश आहे.
#WATCH | Indian Air Force C-17 aircraft that took off from Kabul, Afghanistan with Indian officials, lands in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/1w3HFYef6b
— ANI (@ANI) August 17, 2021
यापूर्वी १६ ऑगस्ट या दिवशी १५० भारतियांना परत आणण्यात आले होते. आणखीही काही भारतीय अफगाणिस्तानात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी अजून एक विमान काबुलला पाठवण्यात येणार आहे.