सिंधुदुर्गात कोरोना लसीकरणासाठीचे प्रशासनाचे नियोजन पूर्ण

बहुप्रतिक्षित कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. त्या अनुषंगाने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या अपप्रचाराला बळी पडू नये !’ – दक्षिणायन अभियान

जे सत्य आहे, ते कसे लपून रहाणार ? नेहरूंच्या गांधीवादी भूमिकेमुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे गोमंतकीय स्वातंत्र्यापासून वंचित राहिले.

नंदुरबार येथे ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ !

मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्याबरोबर अन्य मागण्याही उपोषणार्थींच्याकडून करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पंचायती आणि ग्रामपंचायती यांना अधिक निधी अन् अधिकार देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नव्याने निवडून आलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायती, तसेच ग्रामपंचायती यांना अधिक निधी आणि अधिकार देण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास आमचाही  विरोध ! – दिलीप तळेकर, सभापती, पंचायत समिती, कणकवली

जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पालक मुलांना प्राथमिक शाळेत पाठवणार नाहीत. आमचाही त्याला विरोध असेल, असे कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले

बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवरील छताचा लोकार्पण सोहळा पार पडला !

विशाळगड येथे ३६० वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत उघड्यावर असलेल्या वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने छत उभारण्यात आले आहे.

(म्हणे) ‘गोहत्याबंदी कायद्यातून बैल आणि म्हशी यांना वगळावे !’ – फ्रान्सिस सार्दिन, खासदार, काँग्रेस

कर्नाटक शासनाने संमत केलेल्या गोहत्या बंदी कायद्याचे स्वागत आहे आणि हा कायदा चालूच राहिला पाहिजे; मात्र या कायद्यातून बैल आणि म्हशी यांना वगळणे आवश्यक आहे. अशी मागणी काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील वनसंपदा धोक्यात

मानवाच्या अतिक्रमणामुळे पश्‍चिम घाट धोक्यात आल्याची चेतावणी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन्) संस्थेने नुकतीच भारताला दिली आहे. ‘आउटलूक ३’ या अहवालात संस्थेने हे वास्तव मांडले आहे.

चिंचवड येथे धर्मप्रेमींसाठीचे सोशल मिडिया शिबिर पार पडले

हिंदु जनजागृती समितीच्या शिबिरा अंतर्गत फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर यांचा राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी प्रभावी वापर कसा करावा ?, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला आरक्षणाची सोडत निघणार

कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने लांबलेल्या निवडणुका आता घेण्यात येत आहेत.