सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून भाजीमंडईमध्ये एक मीटर अंतरावर चौकोनी पट्टे

जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !

सोलापूर येथे ऑनलाईन लॉटरी व्यवसायावर गुन्हे शाखेची धाड

येथे ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार व्यवसाय करणार्‍या ‘खेलो जीतो’, ‘फेअरडिल’ आणि ‘साई लकी कुपन’ या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर सोलापूर गुन्हे शाखेने धाड टाकली.

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे ५ जणांवर गुन्हा नोंद

नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.

मुंबई-पुणे येथून १८ सहस्र नागरिक लातूर येथील गावांमध्ये परतले

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्‍या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील यांचा देहत्याग !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. गेले काही मास ते वाकण (जिल्हा रायगड) येथे त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.

‘ती’ सूची पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.

आयात रखडल्याने वाहन उद्योग अडचणीत येणार

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसणार आहे. वाहन उद्योगासाठी लागणारे ३० ते ४० टक्के सुटे भाग चीनहून आयात होतात; मात्र चीनमध्ये उत्पादनावर मर्यादा आल्याने, तसेच आयात थांबल्याने वाहन उद्योगावर संकट निर्माण होणार आहे.