चिंचवड येथे धर्मप्रेमींसाठीचे सोशल मिडिया शिबिर पार पडले

चिंचवड, १६ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील धर्मप्रेमींसाठी १३ डिसेंबर या दिवशी सोशल मिडिया संबंधी शिबिर पार पडले. शिबिराच्या अंतर्गत फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर यांचा राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी प्रभावी वापर कसा करावा ?, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. चिंचवड येथील ६० हून अधिक धर्मप्रेमींनी याचा लाभ घेतला.


शिबिराचा प्रारंभ भावपूर्ण श्‍लोकाने झाली. सामाजिक प्रसारमाध्यमाशी संबंधित सेवा करणार्‍या सौ. अनुराधा पाटील आणि श्री. मिलींद धर्माधिकारी यांनी उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. शिबिरात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.