बलात्काराचा गुन्हा नोंद असलेले निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना अटक

स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी साहाय्य करीन, असे सांगत बंगल्यावर नेऊन वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी कडेगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यावर २८ ऑगस्ट २०२० या दिवशी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता.

समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विक्रमगड तालुक्यात अघोरी जादूटोणा करणार्‍या दोघांना अटक

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्‍हे तलावली येथील एका घरात तांदुळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.

दळणवळण बंदी नंतर पुण्यातील अतिसूक्ष्म धूलिकणांत ५ पटीने वाढ

दळणवळण बंदी नंतर पुण्यासह राज्यातील अल्प झालेले सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण परत वाढले आहे. पुणे शहरातील धूलिकणांचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे.

मालेगाव आणि संभाजीनगर येथे चोरी करणार्‍या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या जेरबंद

उच्चभ्रू दुकानांमधून महागड्या साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणार्‍या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत.

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिन साजरा !

कोल्हापूर डीस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन आणि त्यांच्याशी  संलग्न ७४ संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक डोंगर शिखरांवर आरोहण आणि पर्वत पूजन आयोजित करण्यात आले होते.

‘भामा-आसखेड’च्या पाण्यावरून जलसंपदा आणि महापालिका यांच्यात वाद होण्याची शक्यता

भामा-आसखेड योजना कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला दिल्या जाणार्‍या पाणी कोट्यात २.६४ टीएम्सीने कपात केली जाईल

सावंतवाडीत प्राणघातक आक्रमण झालेल्या टेम्पोचालकाचे निधन

जिमखाना मैदानानजिक लुटण्याच्या उद्देशाने टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) त्यांच्यावर दोघांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये ते गंभीर घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले.

गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासन प्रयत्न करेल ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक नुकतेच संमत केले आहे. यामुळे गोव्यात गोमांसाचा गेले काही दिवस तुटवडा भासू लागला आहे.

सिंधुदुर्गात कोरोना लसीकरणासाठीचे प्रशासनाचे नियोजन पूर्ण

बहुप्रतिक्षित कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. त्या अनुषंगाने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.