पू. (सौ.) योया वाले यांनी संतपद प्राप्त केल्यावर साधकाला त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) योया सिरियाक वाले

१. एका सत्संगात पू. (सौ.) योया वाले उपस्थित असतांना साधकाचे डोळे बंद असूनही त्याला त्याच्या पापण्यांची हालचाल होत असल्याचे जाणवणे आणि तसे चैतन्यामुळे होत असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

‘३०.१०.२०२१ या दिवशी मला एक सत्संग लाभला. त्या दिवशी पू. (सौ.) योया वाले यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले होते. त्या वेळी सत्संगाला त्याही उपस्थित होत्या. तेव्हा एका संतांनी ‘पू. योयाताईंकडे पाहून काय जाणवते ?’, असे विचारले. त्या वेळी मी डोळे बंद केल्यावर मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. माझे डोळे पूर्ण बंद असूनही ‘माझ्या पापण्यांची सतत उघडझाप होत आहे’, असे मला वाटत होते. ‘असे का होत आहे ?’, असे मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘चैतन्यामुळे असे होत आहे.’’

श्री. हरिश पिंपळे

२. पू. योयाताईंना संत सन्मान सोहळ्याच्या वेळी घातलेला फुलांचा हार भोजनकक्षात पाहिल्यावर एका संतांच्या सत्संगात जाणवलेले चैतन्य पुन्हा अनुभवता येणे

पू. योयाताईंना त्यांच्या संत सन्मानाच्या वेळी घातलेल्या फुलांच्या हारातील चैतन्य सर्व साधकांना मिळावे; म्हणून तो भोजनकक्षातील फलकाजवळ ठेवण्यात आला होता. त्या हाराकडे बघून मला एका संतांच्या सत्संगात जाणवलेले चैतन्य अनुभवता आले.’

‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळेच हे चैतन्य अनुभवता आले’, याबद्दल त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. हरीष पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक