सौ. शिल्पा कुडतरकर यांना ‘संत’ म्हणून घोषित केल्यावर एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना आलेल्या अनुभूती

३ ते १०.१.२०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) भावना शिंदे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘मे २०१६ मध्ये एकदा मी नामजप करायला बसले असतांना अधूनमधून ‘मी पृथ्वीवर नसून उच्च लोकामध्ये आहे’, असे मला क्षणभर जाणवत होते. यावरून ‘प्रत्यक्षात माझे अस्तित्व उच्च लोकांतच होतेे’, असे माझ्या लक्षात आले.

स्वतःच्या आचरणातून साधकांना शिकवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले !

‘मला सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत प्रसारकार्य करण्याची संधी मिळाली. सद्गुरु सिरियाकदादा आम्हाला प्रत्यक्षात काही सांगत (मार्गदर्शन करत) नसत; पण मला त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि आचरणातून मार्गदर्शन मिळत असे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि एस्.एस्.आर्.एफ्.चे संत यांच्या सत्संगाच्या वेळी अतिथी कक्षातील, तसेच बाहेरील मार्गिकेतील लाद्यांमध्ये झालेले पालट अन् ‘अतिथी कक्ष निर्गुणाकडे जात आहे’, हे दर्शवणार्‍या अनुभूती

‘३.१.२०१९ च्या रात्री रामनाथी आश्रमातील अतिथी कक्षात (या कक्षात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात.) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि एस्.एस्.आर.एफ्.चे संत यांचा सत्संग चालू होता.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या वतीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या ‘ऑनलाइन’ आध्यात्मिक कार्यशाळांतील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

पॅरिस येथील एका व्याख्यानाच्या शेवटी जिज्ञासू मोठ्या आवाजात आपापसात चर्चा करत होते की, अध्यात्मापेक्षा आधुनिक विज्ञान आणि मानसशास्त्र यांचे मनुष्याला पुष्कळ साहाय्य होऊ शकते.

प.पू. गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि भावबळावर प्रतिकूल परिस्थितीतही विहंगम मार्गाने साधनेत प्रगती करणारेे एस्.एस्.आर.एफ्.चे ४ थे संतरत्न इंडोनेशियातील पू. रेन्डी इकारांतियो !

‘पू. रेन्डीदादा इंडोनेशियातील एका प्रतिष्ठित आणि सधन घराण्यातील आहेत. ते स्वतः अभियंता असून एका आस्थापनात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘पू. (सौ.) शिल्पा यांच्यामध्ये साधकांप्रती पुष्कळ प्रेमभाव आहे. साधकांचा आढावा घेतांना किंवा त्यांना त्यांच्या चुका सांगतांना पू. ताई स्थिर असतात. त्यांच्या वाणीतून आनंद आणि प्रीती जाणवते.

ऑस्ट्रिया, युरोप येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. शारलोते सेंतकेरेस्ती (वय ११ वर्षे) हिची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली  गुणवैशिष्ट्ये !

शिबिरार्थींसाठी एका संतांचा मार्गदर्शनपर एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात शारलोते संतांना साधनेविषयी शंका विचारत होती. त्या वेळी तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा आवाज दैवी असल्याचे जाणवले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या इआय साल्व्हाडोर येथील कु. अमाडा चाव्हरिया यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी वाईट शक्तीने केलेले प्रयत्न आणि कु. अमाडा यांनी त्यांवर केलेली मात !

‘२२.८.२०१८ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांच्या घरी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अग्निहोत्र केले. त्या रात्री मी नामजप करत बसले होते. त्या वेळी घरात पू. रेन्डीदादा उपस्थित होते. पू. रेन्डीदादांच्या या घरात साधक कार्यशाळा घेतात.

साधकांवर पितृवत प्रेम करणारे आणि त्यांच्या साधनेचे दायित्व घेऊन त्यांच्याकडून साधना करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! – पू. (सौ.) शिल्पा राजीव कुडतरकर

‘वर्ष १९९५ मध्ये मी साधनेला आरंभ केला. त्या काळात मला काही अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मी गांभीर्याने साधना करत नव्हते, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला भरभरून प्रेम आणि प्रोत्साहन दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now