एस्.एस्.आर्.एफ.चे पू. देयान ग्लेश्चिच यांना श्री नारायणाकडून मिळालेले ज्ञान आणि त्या संदर्भात त्यांना आलेली अनुभूती

१. पू. देयान ग्लेश्चिच यांचा श्री नारायणाच्या संदर्भातील भाव आणि त्यांना आलेल्या अनुभूती 

पू. देयान ग्लेश्‍चिच

अ. ‘मी प्रथम श्री नारायणाचे नाव ऐकल्यावर माझा भाव जागृत झाला. मागील ६ – ७ वर्षांपासून मला ‘श्री नारायणा’विषयी भक्ती वाटू लागली आणि नंतर ती वाढत जाऊन त्याचे भावात रूपांतर झाले. माझा भाव जागृत होतो, त्या वेळी मला आतून ‘नारायण, नारायण’, असे नाव ऐकू येते.

आ. मी आकाशाचा किंवा संगणकाच्या पडद्यावरील निळा रंग पहातो. तेव्हा ‘मला त्या निळ्या रंगात, म्हणजेच श्री नारायणात विलीन (एकरूप) व्हावे’, असे वाटते.

इ. मला वाटते, ‘नारायण माझे सर्वकाही आहे. मी त्याचा सेवक असून सतत श्री नारायणाच्या चरणांशी रहावे.’ माझ्या आयुष्याचे ध्येय श्री नारायण आहे.’

– (पू.) देयान ग्लेश्चिच, युरोप (९.४.२०२२)

२. ‘अध्यात्माचे ज्ञान नसतांनाही साधना समजणे अन् ती चालू रहाणे’, ही केवळ गुरुकृपा असल्याविषयी पू. देयान ग्लेश्चिच यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

२ अ. लोकांना अध्यात्माविषयी ठाऊक नसल्याने त्यांनी साधना न करणे; मात्र गुरुकृपेने सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ.च्या सर्वत्रच्या साधकांना साधना समजली असल्याने त्यांची साधना चालू असणे : ‘या पृथ्वीतलावर कोट्यवधी लोक आहेत आणि त्यांतील बहुतांश लोक साधना करत नाहीत. एवढेच नाही, तर बऱ्याच लोकांना ‘साधना म्हणजे काय ? देवता काय आहेत ? खरे संत कोण आहेत ? किंवा या पृथ्वीवर देवाचा अवतार जन्माला आलेला आहे’ इत्यादी गोष्टी ठाऊकही नाहीत. आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे ते साधना करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य ध्येयाविना असेच वाया जाते; मात्र सनातनच्या आणि एस्.एस्.आर्.एफ.च्या सर्वत्रच्या साधकांना देवाच्या कृपेने जीवनात कधी ना कधी साधना समजली असून त्यांची साधना चालू आहे. ‘विदेशातील साधक साधनारत असणे’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण भारताबाहेर साधनेविषयीचे (अध्यात्मविषयीचे) ज्ञान अत्यल्प असते.

२ आ. ‘साधना, सूक्ष्म-जगत् आणि अध्यात्म यांविषयी समजणे’, ही देवाने दिलेली दुर्मिळ देणगीच असणे : साधना करतांना काहीतरी नवीन शिकायला मिळाले, एखादी अनुभूती आली अथवा साधनेत प्रगती झाली, तर साधकांना त्याविषयी कृतज्ञता वाटते. असे असले, तरी आपल्याला साधनेला आरंभ करण्याविषयीची माहिती मिळाली नसती, तर हे सर्व शक्य झाले नसते. ‘साधना, सूक्ष्म-जगत् आणि ध्यात्म यांविषयी समजणे’, ही देवाने दिलेली दुर्मिळ देणगीच आहे. देवाने ज्यांना निवडले आहे, त्यांनाच ही देणगी दिली आहे. त्यामुळे साधनेला आरंभ करण्याचा कर्तेपणासुद्धा आपण घेऊ शकत नाही. आपण केवळ त्याच्या (देवाच्या) पावन चरणी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करू शकतो.’

– श्री नारायण ((पू.) श्री. देयान ग्लेश्चिच यांच्या माध्यमातून, युरोप) (५.९.२०२१)

३. अध्यात्माविषयी ज्ञान नसतांनाही साधनेविषयी समजून साधना करू शकणे, नंतर ते सूक्ष्मातून अनुभवता येणे आणि हे केवळ गुरुकृपेने शक्य झाले असल्याचे लक्षात येणे

‘माझ्याविषयी सांगायचे झाले, तर माझा जन्म एका साम्यवादी (कम्युनिस्ट) देशात झाला आणि मला अध्यात्माबद्दल काहीच ठाऊक नव्हते. माझ्या मनात त्याविषयी जिज्ञासा आणि तळमळ होती; परंतु त्याचे ज्ञान नसल्यामुळे मी साधना करू शकत नव्हतो. अध्यात्म समजून घेण्याची क्षमताही माझ्यात नव्हती; मात्र देवाच्या कृपेने मला साधनेविषयी समजले अन् मी साधना करू शकलो. एवढेच नाही, तर सूक्ष्म-जगत्, देवीदेवता आणि श्रीविष्णूचा अवतार यांविषयी मला (सूक्ष्मातून) पहायला अन् अनुभवायलाही मिळाले. त्यामुळे माझ्यामध्ये भक्तीभाव निर्माण होऊन तो वृद्धींगत होत गेला. एखाद्याला पूर्वी अशा प्रकारचे ज्ञान नसेल, तर त्याच्या संदर्भात हे सर्व घडणे कसे शक्य आहे ? ते केवळ गुरूंच्या कृपेमुळे शक्य होते.’

– (पू.) देयान ग्लेश्चिच, युरोप (५.९.२०२१)

जुलै २०२१ पासून पू. देयान ग्लेश्चिच यांना वेगवेगळ्या देवतांकडून ज्ञान मिळणे

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

‘पू. देयान ग्लेश्चिच यांना जुलै ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत वेगवेगळ्या देवतांकडून ज्ञान मिळायला आरंभ झाला आणि ज्या देवतेकडून ज्ञान मिळते, तसे त्यांनी लिहायला आरंभ केला.’ – (पू.) सौ. शिल्पा कुडतरकर, अमेरिका (९.४.२०२२)

  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.