प्रेमळपणा, सहजता आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असणाऱ्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया सिरियाक वाले (वय ४२ वर्षे) !

पू. (सौ.) योया सिरियाक वाले

१. प्रेमभाव

अ. पू. (सौ.) योयाताई कधीतरी माझ्या घरी यायच्या. तेव्हा त्या मलाच विचारायच्या, ‘‘तुला काय खाऊ खावासा वाटतो ? तुला प्रतिदिनच्या दिनचर्येमध्ये पालट मिळावा; म्हणून तुला काय नियोजन करायचे आहे ?’’

आ. आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो, तर त्या मला विचारायच्या, ‘‘जेवायला कुठे जाऊया ? मी तुला आनंद द्यायला आले आहे. तुला हवे तसे सर्व करूया.’’

२. सहजता

त्यांचे वागणे-बोलणे इतके सहज आहे की, कुठल्याही वयाचे साधक त्यांच्याशी मोकळपणाने आणि सहज बोलू शकतात.

३. अहं अल्प असणे

त्यांच्या साधनेतील अडचणी, त्या करत असलेले प्रयत्न आणि चुका यांविषयी त्या कुठल्याही साधकाशी सहज बोलतात. त्या वेळी त्यांच्या मनात प्रतिमेचे विचार येत नाहीत.

४. सेवेची तीव्र तळमळ

पू. योयाताईंना बऱ्याच वर्षांपासून तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्रास होत असतांना त्यांना सूक्ष्म चित्र काढायलाही जमत नसे; पण त्रास न्यून झाला की, त्या सेवा करायच्या. त्यांची तळमळ आणि अनुसंधान यांमुळे अशा स्थितीतही त्यांच्या सूक्ष्म चित्रांची सत्यता ८० टक्के, इतकी असायची.

५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करणे

अ. काही वर्षांपूर्वी एका संतांनी त्यांना काही स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले होते. त्या वेळी त्यांना त्यांच्यातील स्वभावदोषांविषयी पुष्कळ खंत वाटत होती. त्या सतत ‘ते दूर करण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, असे सहसाधकांना विचारायच्या.

आ. प्रत्येक आठवड्याला त्या ज्या स्वभावदोषांवर प्रयत्न करत असत, त्यांचा आढावा घ्यायच्या. ‘ते किती न्यून झाले आहेत ?’, हे पाहून ‘स्वयंसूचना पालटायला हवी का ? त्या स्वभावदोषाचे आणखी काही वेगळे  पैलू जाणवतात का ?’, असे त्या सतत चिंतन करत असत. स्वभावदोषांमध्ये पालट होईपर्यंत त्या तळमळीने प्रयत्न करत असत.

इ. एखाद्या वेळी व्यष्टी साधनेचा आढावा घेणाऱ्या साधकाला अन्य सेवांमुळे आढावा घ्यायला जमले नाही, तर आढावा होण्यासाठी त्या स्वतः धडपड करायच्या.

ई. ‘एखाद्या स्वभावदोषावर प्रयत्न करतांना त्यात पालट होत नाही’, असे पू. योयाताईंना वाटले, तर त्या आढावासेवकांकडे जाऊन ‘प्रयत्नांमध्ये काय पालट केले, तर त्या स्वभावदोषावर मात करता येईल ?’, असे त्यांना विचारायच्या.

उ. एस्.एस्.आर्.एफ.च्या संत पू. (सौ.) भावनाताई शिंदे त्यांचा आढावा घेतात. ‘पू. भावनाताईंना सारणीत लिहिलेल्या चुका आणि स्वयंसूचना वाचता याव्यात अन् त्यात पालट सुचवता यावेत’, यासाठी त्या ‘गूगलशीट’मध्ये सारणी भरतात.

ऊ. त्यांना कोणीही कुठलेही प्रयत्न सांगितले, तरी त्या ते करायला सिद्ध असतात.

६. पू. योयाताईंचे सहज बोलणे खरे होणे

बऱ्याचदा त्या काहीतरी सहज बोलून जायच्या आणि ते खरे व्हायचे. २ वर्षांपूर्वी सद्गुरु सिरियाक वाले प्रसारासाठी विदेशात जात असतांना साधिका ॲलिस स्वेरदा हिला वाईट वाटले आणि ती रडत होती. त्या वेळी पू. योयाताईंनी तिला सांगितले, ‘‘तू काळजी करू नकोस. पुढे भाविनी (या लेखाची लेखिका) तुझी काळजी घेईल.’’ तेव्हा ॲलिस कलेशी संबंधित सेवा करत नव्हती. नंतर काही मासांनी एका संतांनी तिला कलेशी संबंधित सेवा करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या सेवेतील प्रश्न आणि शंका सोडवण्याची सेवा मला मिळाली.

७. त्यांच्यातील प्रेमळपणा, निर्मळता, सहजता आणि मनमोकळेपणा या गुणांमुळे सर्वांना त्या हव्याहव्याशा वाटतात. ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला’, या काव्यपंक्तींप्रमाणे त्यांचे आहे.

८. ‘त्यांच्या समवेत सतत देवाचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवते.

९.  कृतज्ञताभाव

अ. त्यांना कुठल्याही साधकाने साधनेविषयी काहीही सुचवले, तर त्यांना त्या साधकाप्रती कृतज्ञता वाटत असे.

आ. पू. (सौ.) भावनाताई त्यांचा आढावा घेतात. त्यांच्याप्रती पू. योयाताई यांच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे.

‘हे श्रीकृष्णा, ‘पू. योयाताईंच्या आतापर्यंत लाभलेल्या सहवासातून जे काही शिकायला मिळाले, ते तूच माझ्या साधनेसाठी मला शिकवलेस. त्याचा मला लाभ करून घेता येऊ दे आणि माझ्याकडूनही तसे प्रयत्न होऊ दे’, हीच प्रार्थना !

– कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.