१. भक्तांच्या समवेत रहाणे
श्रीविष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वीवर अवतरला, तेव्हा गोकुळात असतांना तो त्याच्या भक्तांच्या, म्हणजे गोप-गोपींच्या समवेत रहायचा. ‘गोप-गोपींना एकत्र रहाता यावे आणि त्यांना साधना करता यावी’, यासाठी श्रीकृष्णाने त्यांना पृथ्वीवर जन्म दिला. त्याचप्रमाणे श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ठिकठिकाणी आश्रम आणि सेवाकेंद्र यांची निर्मिती केली आहे. त्यांनी सर्व साधकांना आश्रमात राहून सेवा आणि साधना करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
२. भक्तांचे स्थुलातील आणि सूक्ष्मातील आक्रमणांपासून रक्षण करणे
गोकुळावरही स्थुलातून आणि सूक्ष्मातून राक्षसांची सतत आक्रमणे होत असत. त्या वेळी श्रीकृष्ण सर्व गोप-गोपींचे रक्षण करत असे. आताही समाजकंटक स्थुलातून आणि वाईट शक्ती सूक्ष्मातून साधकांवर सतत आक्रमणे करत असतात अन् या आक्रमणांपासून परात्पर गुरुदेव सर्व साधकांचे रक्षण करत आहेत.
३. भक्तांचे आपत्काळात रक्षण करणे
गोकुळात जेव्हा मुसळधार पाऊस पडून पूर आला होता, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोप-गोपींचे रक्षण केले होते. त्याचप्रमाणे जेव्हा पृथ्वीवर आपत्काळ येईल, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना विविध आश्रम आणि सेवाकेंद्र यांमध्ये आश्रय देऊन त्यांचे रक्षण करतील अन् त्यांचे हे कार्य गोवर्धन पर्वत उचलल्याप्रमाणेच असेल.
– श्री सरस्वतीदेवी ((पू.) देयान ग्लेश्चिच (युरोप) यांच्या माध्यमातून) (२१.७.२०२१)
|