मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना !

निळे येथील जोतिबा मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता. ग्रामदैवत जोतिबा देवाच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रार्थना करण्यात आली.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! – डॉ. संजय उपाध्ये, ज्येष्ठ प्रवचनकार

अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे अनेक गोष्टींसाठी सवलत मिळाली आहे. त्याचा वापर करतांना विवेक आणि तारतम्य पाळायलाच हवे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.

…अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज बंद पाडू ! – बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी, हातगाडी पंचायत

वर्ष २०१३ च्या सर्वेक्षणानुसार शहरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडीधारकांना १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी परवाना द्या; अन्यथा पिंपरी-चिंचवड महापालिकेला टाळे ठोकून कामकाज बंद पाडू, अशी चेतावणी ‘टपरी, हातगाडी पंचायत’चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.

‘राजे फाऊंडेशन’च्या वतीने तोरणागडावर गड संवर्धन आणि वृक्षारोपण !

छत्रपती शिवरायांनी १६ व्या वर्षी मोगलांकडून श्री तोरणागड (प्रचंडगड) जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पायथ्याशी, तसेच वेल्हे गाव परिसरात ५० वृक्ष लावून ‘राजे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या वतीने गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम पार पडली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून सनातन वह्यांचे वाटप !

देशाच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून येथील माध्यमिक विद्यालयाच्या अंगणवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक असे १७६ विद्यार्थी, तसेच १५ शिक्षक यांना ‘सनातन संस्थे’च्या संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले होते.

धर्मांतरित मुसलमान महिलेने राष्ट्रध्वजाची दोरी कापली !

मुसलमानांशी निकाह केल्यानंतर हिंदु मुली राष्ट्रविरोधी कशा बनतात, याचे हे  उदाहारण ! धर्मांतर करून हिंदु मुलींमध्ये राष्ट्रद्वेषाचे विष धर्मांध कसे पेरतात, हे यावरून लक्षात येते !

राष्ट्रवादी लोकांनी अराजक माजवू पहाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा ! – महंत रामगिरी महाराज

मी समाजात तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या प्रवचनातील मोजकाच भाग ‘एडिट’ करून दाखवण्यात आला आहे. माझा राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्‍वास आहे. हिंदूंनी त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात संघटित व्हावे.

सरकारच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी रुपयांचे प्रावधान !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे.

तलाठी राहत शेख यांनी ध्वजारोहण न केल्याने त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा ! – ग्रामस्थांचे निवेदन

शासनाने १३, १४ आणि १५ ऑगस्टला सर्व शासकीय अन् निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा आदेश दिला होता. असे असतांना हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे तलाठी कार्यालयात १३ आणि १४ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात आले नाही.

Doctors Attack : डॉक्टरांवर आक्रमण झाल्यास रुग्णालयाच्या प्रमुखाला उत्तरदायी धरणार ! – केंद्र सरकार

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणावरून १६ ऑगस्टला डॉक्टरांकडून देशव्यापी आंदोलने करण्यात आली. डॉक्टर आणि परिचारिका संपावर गेल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे.