|
कोलकाता (बंगाल) – कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणावरून १६ ऑगस्टला डॉक्टरांकडून देशव्यापी आंदोलने करण्यात आली. डॉक्टर आणि परिचारिका संपावर गेल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे. ‘केंद्र सरकारने सर्व आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी’, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. यावरून केंद्र सरकारने निर्देश दिले की, डॉक्टरांवर आक्रमण झाल्यास त्याला वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयाचे प्रमुख हेच उत्तरदायी असतील. हिंसाचाराची घटना घडल्यास घटनेच्या ६ तासांच्या आत गुन्हा नोंदवण्यात यावा. तसे न झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखावरही कारवाई होऊ शकते.
आंदोलक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांवर प्रतिदिन कुठे ना कुठे आक्रमणे होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य तो कायदा करावा. यासाठी आंदोलक डॉक्टरांनी केंद्र सरकार आणि आरोग्यमंत्री यांना पत्रही लिहिले होते.