मालवणी (मुंबई) येथे धर्मांध मुसलमान कुटुंबियांचा राष्ट्रध्वजाला विरोध !
मुंबई – मालाड पश्चिम येथील मालवणी विभागातील सुख शांती सेवा संघाच्या रहिवासी संकुलात झालेल्या ध्वजारोहणानंतर घरासमोर राष्ट्रध्वज लावण्यास विरोध करत नाजिया मतियुल अब्दुल रहमान अंसारी (लग्नाअगोदरचे नाव नंदिनी शिंदे) या धर्मांतरित महिलेने चाकूने राष्ट्रध्वजाची दोरी कापली आणि राष्ट्रध्वजाचा खांब पाडण्याचा प्रयत्न केला, तसेच उपस्थितांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी येथील रहिवासी संकुलाच्या सदस्यांनी महिलेसह तिच्या धर्मांध कुटुंबियांच्या विरोधात एफ्.आय.आर्. (प्रथमदर्शनी अहवाल) प्रविष्ट (दाखल) करण्यात केली आहे.
आरोपपत्रात धर्मांध महिला नाजिया अंसारी, तिचा पती आणि सासरे यांनी हिंदूंंविषयी अपशब्द वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मागील वेळी घराजवळ सोसायटीच्या फलक लावल्याचा वाद मनात ठेवून या १५ ऑगस्ट या दिवशी ‘फलकाजवळ राष्ट्रध्वज का लावला ?’ म्हणत खांब पाडायचा प्रयत्न करणार्या महिलेचेे छायाचित्रण या भागातील रहिवाशांनी केले आणि पोलिसांना याविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. (भारताविषयी एवढी घृणा वाटणार्यांची पाळेमुळे पोलिसांनी खोदून काढणे अत्यावश्यक आहे. यांची निष्ठा कुठल्या देशाशी आहे ? हे पहायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|