सिंधुदुर्ग : सावंतवाडी रक्तपेढीतील रिक्त पदे भरावीत, यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे आंदोलन

असे आंदोलन करावे लागणे, हे  आरोग्य विभागाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांवर निवृत्त शिक्षक किंवा डी.एड्. उमेदवार यांना सामावून घेणार !

यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

या आरोपांच्या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ?

सिंधुदुर्ग : शिक्षकांचे आंतरजिल्हा स्थानांतर बंद होणार !

मोठ्या प्रमाणात स्थानांतर होऊन शिक्षक जिल्ह्याबाहेर गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, तर अन्य काही शाळांमधील शिक्षकांची संख्या घटली आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक भरती करतांना सुधारित अटी लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सूचीत बांगलादेशी नागरिकांची नावे आल्याने जिल्ह्यात खळबळ !

केवळ योजनेतून नावे रहित करून लाभ नाही. त्यासाठी या बांगलादेशींवर प्रशासन कारवाई करणार कि नाही ? तसेच ऑनलाईन पद्धतीचा अपलाभ घेऊन ज्यांनी ही नावे डिगस गावात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक नसलेल्या शाळेत लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक

साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

सिंधुदुर्ग : कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेसाठी नोंदणी रहित झालेल्या संस्थेला ठेका !

या संस्थेसह ठेका प्रक्रियेत सहभागी असलेले नगरपंचायतीतील संबंधित अधिकारी आणि स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी वरिष्ठ स्तरावर करणार – भाजपचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षक नसल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी आंदोलने !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना  शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘टोलमुक्त कृती समिती’सह सर्वपक्षियांच्या आंदोलनानंतर ओसरगाव येथील टोल वसुलीला तात्पुरती स्थगिती !

‘टोल वसुली तूर्तास करू शकत नाही’, असे पत्र दिल्यानंतर त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र पुन्हा टोल वसुली चालू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू’ – आंदोलकांची चेतावणी, सिंधुदुर्ग