सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हा धक्का ३.० रिश्टर स्केलचा असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सिंधुदुर्ग : धामापूर येथे मंदिरातील दानपेटी फोडली

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! मंदिरात चोरी होण्याची मासाभरातील ही पाचवी घटना आहे. या आधी वेंगुर्ला, तांबळेश्वर, सागरेश्वर अन् वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथील मारुति मंदिर या ४ मंदिरांत या मासात चोरी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात बिघाड झाल्याने २५ गावे अंधारात !

येथे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली.

सिंधुदुर्ग : तेंडोली येथे उज्ज्वला नदीवर असलेल्या पुलावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले !

पावसाळ्यात पुलावर पडलेले खड्डे ग्रामस्थांना बुजवावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! 

सिंधुदुर्ग : तांबळेश्‍वर येथील श्री भगवती मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! चोरांना कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही धाक नसल्याचे दर्शवणारी घटना ! 

सिंधुदुर्ग : दिगशी-तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची असुविधा

नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग : तात्पुरते स्थानांतर केलेली शिक्षिका एक मासानंतरही मूळ शाळेत आली नाही !

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! वेळ मारून नेणारी उपाययोजना केल्याने एक समस्या सोडवतांना दुसर्‍या समस्या निर्माण ! 

सिंधुदुर्ग : वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वीजदेयके भरणार नाही !

गावात वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी नादुरुस्त असल्याचे कारण महावितरणकडून दिले जाते; मात्र पावसाळ्यापूर्वी वीजवाहिनीवर आलेली झाडे, झुडपे कापली गेली नाहीत. त्यामुळे विजेची समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.