संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थ १५ ऑगस्टला उपोषण करणार !
देवगड – तालुक्यातील कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झालेली नाहीत. याविषयी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना एक वर्षापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची चेतावणी ग्रामपंचायत सदस्य अनिल लाड आणि ग्रामस्थ यांनी दिली आहे.
कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम करतांना प्रवेशद्वारावर दिव्यांग (विकलांग) रुग्णांसाठी ‘रॅम्प’ (दिव्यांग रुग्णांना उपकेंद्रात जाणे सोयीचे व्हावे, यासाठी बनवलेला उतरता मार्ग) बांधण्यात आलेला नाही. हस्तप्रक्षालन पात्र (बेसीन) आणि शौचालय यांच्या कामांत त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाचे काम करतांना अंदाजपत्रकात समावेश असलेली कामे प्रत्यक्षात केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या कामात संगनमताने भ्रष्टाचार झाला आहे, असे अनिल लाड आणि ग्रामस्थ यांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन ! |