Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.

BhagwadGeetaForMBAcourse : अलाहाबाद विश्‍वविद्यालयात व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार भगवद्गीता !

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन !

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

स्वत:च्या संकल्पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्ण ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

शेकडो शास्त्रज्ञ आणि पंडित यांनी ‘महाभारतातील युद्धात श्रीकृष्ण का जिंकला आणि कौरव का हरले ?’, याचा अभ्यास केला. तेव्हा त्या सर्वांना एकच उत्तर मिळाले, ‘श्रीकृष्ण आणि पांडव यांनी त्यांचा अहंकार सोडला, तसेच त्यांना धर्माचा विजय हवा होता. म्हणून ते जिंकले.

आज असलेल्‍या कोजागरी पौर्णिमेचा इतिहास अन् महत्त्व !

कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्‍णाने वज्रमंडळात रासोत्‍सव साजरा केला’, असे श्रीमद़्‍भागवतात म्‍हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्‍वीच्‍या सर्वांत जवळ असतो आणि त्‍यामुळे तो मोठा दिसतो.

गोवा : धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

मद्याच्या धुंदीत असे कृत्य केल्याचे काँग्रेसवाले सांगतील; पण त्यांना मद्यधुंद अवस्थेत जन्माष्टमीचेच फलक फाडण्याचे भान कसे रहाते ? सरकारने याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी !

श्रीकृष्‍णाला आत्‍मनिवेदन करतांना त्‍याने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेली सूत्रे !

परिपूर्ण कर्म केल्‍यास प्रत्‍येक कर्म मलाच अर्पण होते

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्‍ण यांच्‍यातील साम्‍य दर्शवणारी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्‍हणतात, ‘‘मी श्रीकृष्‍ण नाही. श्रीकृष्‍णाचे कार्य अलौकिक आहे.’’ त्‍यावर श्रीकृष्‍णानेच मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या कार्यातील साधर्म्‍यता दर्शविणारी सूत्रे सुचवली.