श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्याकडे पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘एकदा एका सत्संगात ‘श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सौ. वनिता बिच्चू

मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे २ – ३ मिनिटे पाहिले. तेव्हा मला जाणवले,

अ. श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गरगर फिरत आहे.

आ. श्रीकृष्णाच्या डोळ्यांची हालचाल होत आहे.

इ. श्रीकृष्ण उठून येत आहे.

ई. ते चित्र सजीव झाले आहे.

२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. मला प.पू. भक्तराज महाराज यांचे मुखमंडल पिवळे दिसले. मला त्यांच्या हाताचा पंजा पिवळसर दिसला.

आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या मुखमंडलावर पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

इ. ‘त्यांच्या हातांतून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुलाबी झालेल्या सदर्‍याकडे पाहून ‘गुरुदेव प्रीतीचे मूर्तीमंत रूप आहेत’, असे मला वाटले.

आ. ‘त्यांच्याकडून प्रीतीची स्पंदने आणि निर्गुणतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

गुरुदेवा, तुमच्या कृपेने मला या प्रयोगात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. वनिता प्रभाकर बिच्चू (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६७ वर्षे), फोंडा, गोवा. (८.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक