‘माझे आई-बाबा सेवाकेंद्रात नसतांना माझी चिडचिड झाल्यावर किंवा माझ्या मनाविरुद्ध प्रसंग घडल्यावर मी माझ्या मनात आलेले विचार लिहून ठेवते किंवा श्रीकृष्णाचे चित्र काढते. येथे दिलेले श्रीकृष्णाचे चित्र काढतांनाही माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती.
१. मनाची स्थिती चांगली नसतांना श्रीकृष्णाचे चित्र काढत त्याला मनाची स्थिती सांगितल्यावर त्याचा आधार वाटणे
एकदा आई-बाबा सेवाकेंद्रात नसतांना माझ्या मनाविरुद्ध प्रसंग घडल्यामुळे माझी चिडचिड झाली होती; म्हणून मी श्रीकृष्णाचे चित्र काढत त्याला माझ्या मनातील विचार सांगत होते. तेव्हा ‘श्रीकृष्ण माझे विचार ऐकत आहे’, असे मला जाणवले. माझ्याकडून एकाच बैठकीत हे चित्र पूर्ण काढून झाले नाही; परंतु जेवढे चित्र काढले, तेवढे काढूनही मला पुष्कळ हलके वाटले. माझे रडणे थांबले आणि एकटी असतांना मला त्याचा आधार वाटला. नंतर मी उर्वरित चित्र पूर्ण केले.
२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीकृष्ण आहेत’, असे वाटत असल्याने काढलेले श्रीकृष्णाचे चित्र त्यांच्यासाठी पाठवणे
या प्रसंगानंतर ‘माझे बाबा (श्री. नीलेश टवलारे) रामनाथी आश्रमात जाणार आहेत’, असे मला कळले. मला ‘गुरुदेव श्रीकृष्णच आहेत’, असे वाटते; म्हणून ‘हे चित्र गुरुदेवांना भेट द्यायला हवे’, असे मला वाटले आणि मी माझ्या बाबांच्या समवेत हे चित्र त्यांच्यासाठी पाठवले.’
– कु. गिरिजा नीलेश टवलारे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय १० वर्षे), अमरावती (१५.९.२०२३)