हे श्रीसत्‌शक्ति माते, तुझी प्रत्येक कृती शिकण्यासाठी ।

‘एकदा माझी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडील सेवा पूर्ण झाल्यावर माझ्या मनात आले, ‘त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला पुष्कळ शिकता येते. त्यांची प्रत्येक कृती ही भगवंताची लीलाच आहे’, या विचारांनी मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा देवाने मला पुढील कविता सुचवली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
कु. प्रणिता भोर
कु. प्रणिता भोर

हे श्रीसत्‌शक्ति माते, तुझी प्रत्येक कृती शिकण्यासाठी ।
आणि माझ्या प्रत्येक विचारात केवळ तूच असशी ।। १ ।।

शब्दांच्या पलीकडे अन् भावभक्तीचे ।
असे आपले भावबंध जुळावे ।। २ ।।

प्रत्येक क्षणी मी तुझ्या चरणी असावे ।
घसरले जरी मी, हात देऊन तू मज सावरावे ।। ३ ।।

तुझ्या स्मरणातच मी गुंतावे ।
तुझ्या चरणी लीन होऊन जावे ।। ४ ।।

वरील कविता सुचल्यावर माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाला पुढील प्रार्थना झाली.

तूच कृपा कर मजवरी ।

कृष्णा, आलास तू माझ्यापाशी ।
काय सांगितलेस तू माझ्या कानी ।
ज्याने भाव जागृत झाला माझ्या मनी ।। १ ।।

गुरुचरणांचा ध्यास रुजला अंतरी ।
वाढवून सेवेची तळमळ माझी ।
तूच कृपा कर मजवरी ।। २ ।।

– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक