गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. काबूलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत भारतीय संस्कृती पसरली असल्याने त्या ठिकाणी हिंदु मंदिरांचे अस्तित्त्व स्वाभाविक आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पुजावयाची मूर्ती कशी असावी ?

आजकाल धर्मशास्त्र विचारात न घेता आपापली आवड आणि कल्पनासौंदर्य यांवर भर देऊन विविध आकारांत आणि रूपांत (उदा. गरुडावर बसलेला गणेश, श्रीकृष्णाच्या वेशातील गणेश अन् नर्तन करणारा गणेश) श्री गणेशाच्या मूर्ती पुजल्या जातात.

शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे फेसबूकवरून श्री गणेशाचे विडंबन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त !

फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्‍लील चित्रे ‘पोस्ट’ (प्रसारित) करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी जातीय तेढ निर्माण करणारा संदेश पसरवला होता.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली.

‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’, ‘शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती’, ‘सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती’ आणि ‘सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती’ यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कागदी किंवा अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापि वापरू नका.

शाडूच्या गणेशमूर्तींवरील जीएसटी कर ५ टक्के न्यून ! 

शाडूच्या श्री गणेशमूर्तीवर २८ टक्के जीएसटी कर लावण्यात आला होता. हा कर न्यून करावा, अशी मागणी राष्ट्र्वादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now