महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांच्या आवाजात विविध देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. त्यातील ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हे नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकतांना काय जाणवते ?’, याचा साधकांना अभ्यास करायला सांगितला होता. त्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
१ अ. कु. म्रिणालिनी देवघरे
१. ‘नामजप ऐकतांना माझ्या सहस्रारातून संपूर्ण शरिरात चैतन्य जात आहे’, असे मला जाणवले.
२. ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हे नामजप जणू लिहिल्याप्रमाणे ती अक्षरे माझ्या डोळ्यांसमोर येत होती.
३. मला गुलाबी रंगाचा प्रकाश दिसला आणि माझे मन निर्विचार झाले. नामजपामध्ये मला पिवळ्या रंगाचा चैतन्याचा एक गोळा दिसला. तो गोळा थोड्या वेळाने मोदकाच्या रूपात दिसला.’
१ आ. सौ. भक्ती कुलकर्णी
१ आ १. ‘श्री गणेशाच्या नामजपाच्या लहरी वातावरणात जात आहेत आणि वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
१ इ. सौ. सावित्री इचलकरंजीकर
१ इ १. ‘नामजप ऐकून माझे मन लगेच स्थिर झाले आणि माझी भावजागृती होऊ लागली.’
२. सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. कु. मृण्मयी कोथमिरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
२ अ १. गणेशतत्त्व आकृष्ट झाल्याचे जाणवणे : ‘हे नामजप ऐकतांना ‘वातावरणातील गणेशतत्त्व माझ्याकडे आकृष्ट होत आहे, तसेच मला आनंद जाणवून माझे मन आणि बुद्धी यांमधील विचार स्थिर होत आहेत’, असे मला जाणवले.’
२ आ. कु. कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
१. ‘ब्रह्मरंध्रातून माझ्या देहात गणपतीचे तत्त्व येत असून ‘मी वेगळ्याच स्थितीत आहे’, असे मला जाणवले. ‘श्री गणपति पिवळ्या रंगात चकाकत आहे आणि त्याचे किरण सर्वत्र पसरले आहेत’, असे मला दिसत होते. ‘गणपति माझ्या अंतर्मनात स्थापन होऊ दे’, अशी मी त्याला प्रार्थना केली.
२. ‘प्रत्यक्ष श्री गणपति माझ्यासमोर आहे. त्याच्या चरणांवर मी नतमस्तक झाले आहे आणि गणपति माझ्या सर्व प्रार्थना इतर देवतांपर्यंत पोचवत आहे’, असे मला जाणवले.’
२ इ. कु. सुखदा गंगाधरे
२ इ १. मनात विचार आल्यावर ‘श्री गणेश ‘अनावश्यक विचार करायचे नाहीत’, असे सांगत आहे’, असे जाणवणे : ‘नामजप करतांना ‘एक प्रकारची ऊर्जा मिळत आहे’, असे मला जाणवले. नामजपाच्या वेळी मनात येत असलेलेे विचार मला थांबवता येत नव्हते. त्या वेळी श्री गणेश माझ्याशी सूक्ष्मातून बोलत असून ‘अनावश्यक विचार करायचे नाहीत’, असे सांगत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर ‘ते विचार न्यून होऊन श्री गणेशाच्या चरणी अर्पण होत आहेत, तसेच नामजपातून चैतन्य आणि शक्ती ग्रहण होत आहे’, असे मला जाणवले.’ (१९.९.२०२१)
(सर्व सूत्रांचा दिनांक सप्टेंबर २०२१)
श्री गणपतीचे नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप यांवर उपलब्ध‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने विविध नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हे श्री गणपतीचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. तेे सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. १. नामजप ऐकण्यासाठी सनातनच्या संकेतस्थळाची मार्गिका https://www.sanatan.org/mr/chant २. ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या https://www.sanatan.org/Chaitanyavani ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हे नामजप ऐकून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करून काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास त्या आम्हाला पुढील ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवाव्यात. ई-मेल : [email protected] ई-मेल नसल्यास त्या पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. टपालाचा पत्ता : श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.’ |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |