
कोल्हापूर – भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये २७ मे या दिवशी कोल्हापूर येथे रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद मधील १० शिवसेना नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप कार्यालयात नगरसेवकांनी हा प्रवेश केला. या प्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, तसेच अन्य उपस्थित होते.
दोनच दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भारतीय जनता पक्षाच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. यानंतर लगेचच भाजपकडूनही रायगडमधील शिवसैनिकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. माथेरान नगर परिषदेत एकूण १७ नगरसेवक असून वर्ष २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत १४ ठिकाणी शिवसेनेचे सदस्य निवडून आले होते. काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. या नगर परिषदेत भाजपचा एकही सदस्य नव्हता. आता मात्र १० सदस्यांच्या पक्ष प्रवेशाने माथेरान नगर परिषदेत भाजपची सत्ता आली आहे.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !