मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

सोलापूर – येथील महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ११ च्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे पद उच्च न्यायालयाने रहित केले आहे. मगर यांना ३ अपत्ये असून तिसरे अपत्य हे १२ सप्टेंबर २००१ नंतरचे असल्याचे कारण देत उच्च न्यायलयाने हा निकाल दिला आहे. भाजपच्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी यासंदर्भात याचिका प्रविष्ट केली होती, अशी माहिती मुंबई उच्च न्यायलयातील अधिवक्ता अजित आळंगे यांनी दिली.
वर्ष २०१७ मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये भाजपच्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांचा पराभव करून शिवसेनेच्या अनिता मगर निवडून आल्या होत्या; मात्र मगर यांना ३ अपत्ये असल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रहित करण्याची मागणी म्हंता यांनी न्यायालयाकडे केली होती. यासंदर्भात सोलापूर न्यायालयाने म्हंता यांच्या बाजूने निकाल देत मगर यांचे पद रहित केले होते. त्यानंतर अनिता मगर यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका प्रविष्ट केली होती; मात्र म्हंता यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तीवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने सोलापूर न्यायालयाचा निकाल कायम ठेवला असून अनिता मगर यांची याचिका फेटाळली आहे.
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !