शिवसेना शाखाप्रमुख कै. किरण माने यांच्या स्मरणार्थ ‘आयसोलेशन रुग्णालयास’ विनामूल्य ‘पीपीई किट’ वाटप !

‘आयसोलेशन रुग्णालयास’ ‘पी.पी.किट’ वाटप करतांना मंजित माने, तसेच अन्य

कोल्हापूर, १ जून (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला साहाय्य म्हणून ‘आयसोलेशन रुग्णालयास’ शिवसेना शाखाप्रमुख कै. किरण माने (बुलंद दरवाजा शिवसेना शाखाप्रमुख) यांच्या स्मरणार्थ अवचीत पीर तालीम यांच्या वतीने ‘पीपीई किट’ आणि ‘एन्. ९५’ मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना युवासेनेचे मंजित माने यांच्यासह विवेक जाधव,  मंजीत माने, वैभव जाधव, संदेश इंगवले उपस्थित होते.