(म्हणे) ‘राज ठाकरे यांचे वक्तव्य दंगली घडवणारे !’ – दीपाली भोसले-सय्यद, अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या

धर्मांध नेते जेव्हा हिंदू, हिंदु धर्म यांविषयी अनेकदा विखारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात, तेव्हा ‘अशा वक्तव्यांमुळे दंगली होतील’, असे दीपाली सय्यद यांना कधी वाटत नाही का ?

राज ठाकरे आणि दीपाली भोसले-सय्यद

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविषयी केलेले वक्तव्य मला पटलेले नाही. हे बोलून तुम्ही (राज ठाकरे) दंगली भडकावत आहात, वाद निर्माण करत आहात, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी व्यक्त केली आहे. एवढेच बोलून त्या थांबल्या नाहीत, तर ‘प्रत्येकाचा धर्म त्याच्यासाठी मोठा किंवा महत्त्वाचा असतो. तुम्हाला या गोष्टीचा त्रास होत असेल, तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. यापूर्वी तिहेरी तलाकवर निर्णय मिळाला, आताही मिळेल’, असेही वक्तव्य केले आहे. (मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याचा, भोंगे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ७५ डेसिबलपेक्षा न्यून आवाजात लावण्याचा निर्णय यापूर्वीच दिला आहे, हे सय्यदबाईंनी आधी माहीत करून घ्यावे. त्यामुळे राज ठाकरे यांना न्यायालयात जाण्यास सांगून दीपाली सय्यद यांनी अज्ञान प्रकट करून स्वतःचे हसे करून घेतले आहे ! – संपादक)

राज ठाकरे यांनी ‘सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर अशा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा’, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्या बोलत होत्या.