नागपूर – गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या युवासेनेकडून ३ एप्रिल या दिवशी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या वेळी शहरातील महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘थाळी वाजवा आंदोलन’ करण्यात आले. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा आर्थिक भार हा सामान्य कुटुंबांना सोसावा लागत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सत्तेत नसतांना महागाईच्या विरोधात आंदोलन करत होत्या. आता त्यांना महागाई दिसत नाही का ? असाही प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला.