शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या !
आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.
आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.
१ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
भाजप त्यांचे काम ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून करून घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
पत्रकारांशी बोलतांना अपक्ष खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, हिंदुत्वाची बाळासाहेबांची विचारधारा ही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पार पाडत आहेत. त्यामुळे ते लवकरच उद्धव ठाकरे यांची जागा घेतील. ‘मातोश्री’समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणू.
शिवसेनेकडून आमदार रवि राणा यांच्या निवासाबाहेर आंदोलन !
टॉयलेट घोटाळा हा एक ‘ट्रेलर’ आहे. मी त्याविषयी तक्रार प्रविष्ट करणार आहे. हा घोटाळा पुष्कळ मोठा आहे. आय.एन्.एस्. विक्रांत प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या जामिनावर सुटले आहेत, त्यांना उत्तर द्यावेच लागेल.
विशिष्ट पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत आहे ? ज्या परिस्थितीत अटक टाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावरून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात चालू आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बनावट कुळे उभी करून जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या भूमी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे.
मद्याची दुकाने आणि बार यांना देण्यात येणारी हिंदूंच्या देवतांची नावे हटवण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रयत्नशील होती. यासाठी समितीने निवेदने देणे, जागृती करणे यांसारखे उपक्रम राबवले. या निर्णयामुळे समितीच्या या मोहिमेला यश मिळाले आहे, असेच म्हणावे लागेल.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नुकत्याच कह्यात घेतलेल्या मालमत्ता या आर्थिक घोटाळ्यातून जमवलेल्या काळ्या पैशांतून खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने प्रवीण राऊत यांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात केला आहे.