‘सिख फॉर जस्टिस’ने घेतले पंतप्रधान मोदी यांचा वाहन ताफा अडवण्याचे दायित्व !

बंदी घातलेल्या आणि अमेरिकेतून चालवण्यात येणार्‍या खलिस्तानी संघटनेकडून भारतात अन् तेही पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडवण्याचे धाडस करतेच कसे ? सुरक्षायंत्रणा झोपलेल्या आहेत का ? कि त्या खलिस्तान्यांना फितूर झाल्या आहेत ?

एक वर्षापूर्वी खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांना ठार करण्याच्या बनवलेल्या व्हिडिओ प्रमाणेच पंजाबमधील मोदी यांच्या रस्ताबंदची घटना !

यावरून खलिस्तानवादी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करू पहात आहेत, हे स्पष्ट आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

इंदिरा गांधी यांच्या हत्यार्‍यांना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने ‘हुतात्मा’ ठरवत श्रद्धांजली वाहिली !

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा ह्या इंदिरा गांधी यांच्या हत्यार्‍यांना श्रद्धांजली वहातांनाही मौन बाळगून आहेत; कारण त्यांना पंजाबमधील विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे, हे लक्षात घ्या.

ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या हत्येचा प्रयत्न करणारा शीख तरुण पोलिसांच्या कह्यात

जालियनवाला बागेमधील नरसंहाराचा सूड घेण्यासाठी एक तरुण ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या महालात धनुष्यबाण घेऊन घुसल्याची घटना समोर आली आहे. जसवंत सिंह चैल असे त्याचे नाव असून तो १९ वर्षांचा आहे.

सुवर्ण मंदिरातील जमावाकडून ठार झालेल्या व्यक्तीला ‘हिंदु आतंकवादी’ ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

ब्रिटनमधील महिला शीख खासदार प्रीतकौर गिल यांचा हिंदुदेष !
लोकांच्या विरोधानंतर ट्वीट हटवले !

केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

कपुरथळा (पंजाब) येथे शिखांच्या पवित्र ध्वजाची विटंबना करणार्‍याचा मारहाणीत मृत्यू !

‘पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आल्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत का ?’, याचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे !

पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वाराचा प्रसाद देण्यासाठी सिगारेटच्या वेष्टनाचा वापर !

एरव्ही भारताच्या विरोधात गरळओक करणारे खलिस्तानवादी पाकिस्तानातील या कृत्याचा चकार शब्दानेही निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! यातून ‘खलिस्तानवाद्यांना जिहादी पाककडून शीख पंथाचा द्वेष केलेला चालतो’, असे म्हणायचे का ?

अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणार्‍याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍याला जमाव मारहाण करून जिवंत जाळतो, तर पंजाबमध्ये धार्मिक स्थळाचा अवमान करणार्‍याला जमाव ठार करतो. दुसरीकडे हिंदू त्यांच्या धार्मिक गोष्टींच्या अवमानाविषयी वैध मार्गाने काहीतरी आणि तेही कधीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतात !

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

स्थानिकांचा विरोध असतांना प्रशासन सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला अनुमती कशी देते ? हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती कशी मिळते ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !