|
|
लंडन (ब्रिटन) – काही दिवसांपूर्वी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबला (शिखांचा पवित्र धर्मग्रंथाला) अपवित्र करण्याचा प्रयत्न करणार्या एका व्यक्तीचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याविषयी ब्रिटनमधील पहिल्या शीख महिला खासदार प्रीतकौर गिल यांनी ट्वीट करून ‘हिंदु आतंकवाद्याला सुवर्ण मंदिरात शिखांच्या विरोधात हिंसा करण्यापासून रोखण्यात आले’, असे म्हटले होते. यानंतर त्याला अनेकांनी विरोध केला. तसेच ब्रिटनमधील भारतीय दूतावासानेही याचा निषेध केला. त्यानंतर प्रीतकौर गिल यांनी हे ट्वीट हटवले आहे.
UK Sikh MP calls Golden Temple lynching victim a ‘Hindu terrorist’, deletes Tweet after outragehttps://t.co/Q9xQldEf4n
— OpIndia.com (@OpIndia_com) December 21, 2021