इंदिरा गांधी यांच्या हत्यार्‍यांना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने ‘हुतात्मा’ ठरवत श्रद्धांजली वाहिली !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्‍याच्या वेळी झालेल्या सुरक्षेमधील अक्षम्य चुकीविषयी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा मौन बाळगून आहेत, तसेच त्या इंदिरा गांधी यांच्या हत्यार्‍यांना श्रद्धांजली वहातांनाही मौन बाळगून आहेत; कारण त्यांना पंजाबमधील विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे, हे लक्षात घ्या ! अशी काँग्रेस म्हणे कायद्याचे राज्य देणार ! – संपादक
  • माजी पंतप्रधानांच्या हत्याऱ्यांना ‘हुतात्मा’ संबोधणाऱ्यांना आजन्म कारागृहात डांबा ! – संपादक
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी

अमृतसर (पंजाब) – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने (‘एस्.जी.पी.सी.’ने) येथे ६ जानेवारी या दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. कमेटीने या दोघांना हुतात्मा ठरवले आहे. या दोघांना ६ जानेवारी १९८९ मध्ये तिहार कारागृहात फाशी देण्यात आली होती. ‘एस्.जी.पी.सी.’ने ट्वीट करून म्हटले, ‘आज ऐतिहासिक दिन आहे.’