दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १० ते १२ वर्षांचा मुलगा दगड फोडतांना आढळला !; गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रक्कम जप्त; पण पोलीस तोतया असल्याचे उघड !…

भारतीय राज्यघटनेनुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींना अल्प आर्थिक मोबदला देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून त्यांचा शैक्षणिक अधिकार हिसकावून त्यांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून यामध्ये कायद्यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले हा सत्तेचा गैरवापर ! – शरद पवार, खासदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याविषयी काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा, यासाठी माझ्यासह मल्लीकार्जुन खर्गे, डी. राजा, तसेच तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे

(म्हणे) ‘जाणकार व्यक्तीवर आक्रमण करण्याची झुंडशाही लोकांना न पटणारी !’ – शरद पवार

पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांना ‘देशाला दिशा देणारे आणि देशासाठी कष्ट करणारे’ म्हणून शरद पवार यांनी क्रांतीकारक अन् देशभक्त यांचा अवमानच केला आहे !

पवार गटाचे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव अंतिम !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी केली होती. त्या नावांपैकी पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे खरे स्वरूप दाखवणार्‍या ‘दगाबाज’ या पुस्तकाचे प्रकाशन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्तेचा वापर करून, तसेच विरोधकांशी असलेली मैत्री आणि प्रसारमाध्यमे यांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळी बाजू लपवली आहे. त्यांचे खरे स्वरूप जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे.

अजित पवार यांच्या घोटाळ्यांना भाजप संरक्षण देत आहे ! – शालिनीताई पाटील, माजी मंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ सहस्र कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर ७० सहस्र कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत.

Eknath Shinde faction is real Shiv Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता !

निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ या दिवशीची मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे, असा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

अजित पवार यांच्यासह गेलेल्यांचा आता फेरविचार नाही ! – शरद पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

देहलीतील भाजप सरकार गेले, तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन क्षमा मागतील, या आमदारांमध्ये घालमेल चालू आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला होता.

Denigration Prabhu Shriram : ‘श्रीराम मांसाहारी होता’ असे म्हणणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध नाशिक येथे गुन्हा नोंद !

आव्हाड कधी श्री सरस्वती देवीचा, कधी प्रभु श्रीरामाचा, तर कधी हिंदु धर्माचा अशलाघ्य भाषेत करत असलेल्या अवमानावरून त्यांच्या नसानसांत हिंदुद्वेष किती भिनला आहे ?, हेच दिसून येते ! आव्हाड यांना मते देऊन निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?