लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

महाविकास आघाडी ५ वर्षे चालेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यशासनातील प्रत्येकजण समर्थपणे दायित्व निभावत असून हे शासन ५ वर्षे चालेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रश्‍न आहेत. त्यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या वेळी ‘देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला सिद्ध आहात का ?’ या दर्डा यांच्या प्रश्‍नावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले.

शेतीसाठी तातडीने अर्थसाहाय्य करणे आवश्यक ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने विविध क्षेत्रांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतीसाठी घोषित केलेले अर्थसाहाय्य पुरेसे नाही.