‘चंद्रयान-२’च्‍या अपयशावरून ‘बीबीसी’ने भारतावर केलेल्‍या टीकेचा जुना व्‍हिडिओ प्रसारित !

बीबीसीची भारतद्वेषी मानसिकता असल्याने तिच्याकडून याहून वेगळे काय घडणार ? अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्य ठरील !

आज सायंकाळी ६.०४ वाजता ‘लँडर विक्रम’ चंद्रावर उतरणार !

नियंत्रण कक्षातून आदेश मिळाल्यानंतर रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. या काळात त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.

रशियाने केले ‘लुना २५’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण !

अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत ‘लुना २५’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

‘जीवनगौरव’ पुरस्‍कार माझ्‍या गुरूंचा असून त्‍यांनी दिलेल्‍या ज्ञानाचा मी भारवाहक आहे ! – प्रा. अद्वयानंद गळतगे

या प्रसंगी विंग कमांडर शशिकांत ओक, महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष डॉ. मिलिंद जोशी, कार्यक्रमाचे अध्‍यक्ष आणि संत साहित्‍याचे अभ्‍यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद अभ्‍यासक डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, वेदांत गळतगे यांसह अनेक मान्‍यवर आणि श्रोता वर्ग उपस्‍थित होता.

अंतराळ यानाला परमाणू ऊर्जेवर चालवण्याच्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’चे काम चालू !

इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ‘चॅटजीपीटी’शी स्पर्धा करण्यासाठी स्थापन केले ‘एक्सएआय’ आस्थापन !

‘ओपन एआय’चे चॅटजीपीटी आणि गूगलचे ‘बार्ड’ या प्रणाली अशा आहेत, ज्यांना आपण कोणताही प्रश्‍न विचारला, तरी त्याला ते अचूकतेच्या जवळ नेणारी उत्तरे देतात.

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची शेवटची सिद्धता : अंतराळ यानाला जोडले रॉकेट !

श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ येथून ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण होणार असून ५ जुलै या दिवशी अंतराळात सोडणारे रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’ची त्याला जोडणी करण्यात आली.

‘चॅटजीपीटी’चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

भारतासमोर असणार्‍या संधी, त्यासाठी भारताने काय काय केले पाहिजे ?, तसेच चढ-उतार रोखण्यासाठी जागतिक नियमन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली-ऑल्टमन

इस्रो जुलैमध्ये ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार !

इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतोच, असे नाही; पण त्यातून शिकून पुढे जायला हवे. अपयश आले; म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये.

वेदांमधून मिळालेले विज्ञान पाश्‍चात्त्यांनी स्वतःच्या नावाने प्रसारित केले ! – एस्. सोमनाथ, अध्यक्ष, इस्त्रो

वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्‍चात्त्य देशांमध्ये पोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या नावाने त्याचा प्रचार केला, असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी केला आहे.