रशियाने केले ‘लुना २५’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण !

मॉस्को (रशिया) – रशियाची अंतराळ संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने ‘लुना २५’ या  यानाचे ११ ऑगस्ट या दिवशी यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने प्रक्षेपित केलेले ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या भूमीवर २३ ऑगस्ट या दिवशी यशस्वीरित्या उतरवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

अशातच रशियाही ‘लुना २५’ हे यान त्याच कालावधीत किंवा त्यापूर्वी चंद्रावर उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत ‘लुना २५’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. रशिया ‘लुना २५’ या यानाच्या माध्यमातून तब्बल ४७ वर्षांनी चंद्रावर उतरणार आहे. याआधी वर्ष १९७७ मध्ये रशियाने त्याचे यान चंद्राच्या भूमीवर उतरवले होते.