चंडीयागाच्या वेळी सप्तशती पाठातील श्लोक चालू असतांना वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) !

‘‘सुदर्शनचक्र पिवळे असते. या चित्रात हे सर्व रंग कसे आहेत ?’’ यावर पू. वामन म्हणाले, ‘‘हे सर्व रंग त्यात असतात; पण आपल्याला ते दिसत नाहीत. सगळे देवबाप्पा असतात ना !’’

ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !

‘जसे आपले मन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या दिव्य चरणी समर्पित होण्यासाठी आतुरले आहे, अगदी तशीच ओढ श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची लागली आहे. त्यांची आपल्यावर एवढी प्रीती आहे की, त्यांनाच आपल्याला डोळे भरून पहायचे आहे.

उतारवयातही समष्टीसाठी तन आणि मन यांचा त्याग करून साधकांसमोर आदर्श ठेवणारे पू. विनायक कर्वे (वय ८० वर्षे) आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

पू. कर्वेमामा सध्या ‘समष्टी संतांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करत आहेत. ते सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात, तसेच स्वागतकक्षातही सेवा करतात.

बेळगाव येथील प .पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन ! 

जगातून दुःख नाहीसे व्हावे. जगात अनेक कल्पतरु निर्माण व्हावेत. चैतन्याचे चिंतामणी सर्व लोकांना मिळावेत. सर्व जण सुखी व्हावेत.-पसायदान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !

‘गुरुकृपेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. ‘गुरुदेवांनी मला उचलून सुरक्षित ठेवले आणि केवळ गुरुकृपेमुळेच मी वाचलो आहे’, असे त्यांना वाटायचे.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांच्यात बालवयातच असलेली चुकांविषयीची संवेदनशीलता आणि शिकण्याची वृत्ती !

या संवादातून पू. भार्गवराम यांची शिकण्याची वृत्ती माझ्या लक्षात आली. ‘गुरुदेवा, केवळ आपल्याच कृपेने पू. भार्गवराम विचारत असलेल्या प्रश्नांना मला उत्तरे देता आली’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

भाव आणि चैतन्य यांची अनुभूती देणारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे देहली सेवाकेंद्रातील आगमन !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सतत साधनारत असणार्‍या आणि साधकांप्रती प्रेमभाव असणार्‍या सनातनच्या ६० व्या समष्टी संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) !

आश्‍विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना), म्हणजेच १५.१०.२०२३ या दिवशी पू. रेखा काणकोणकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.