‘सनातनच्या मंगळुरू सेवाकेंद्रात वास्तव्यास असलेले पू. विनायक कर्वे (सनातनचे २३ वे संत, वय ८० वर्षे) आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या संत, वय ८६ वर्षे) ‘संस्थेने आयोजित केलेले कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावेत आणि त्यात कोणतीही अडचणी येऊ नये’, यासाठी नामजपादी उपाय करतात. त्यांना ‘‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नामजपादी उपाय करू शकता का ?’’, असे विचारण्यात आले होते.
पू. कर्वेमामा सध्या ‘समष्टी संतांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करत आहेत. ते सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात, तसेच स्वागतकक्षातही सेवा करतात. त्यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी नामजपादी उपाय करू शकता का ?’’, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला वेळ आहे. मी एक घंटा नामजपादी उपाय करू शकतो.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.
पू. राधा प्रभु यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी नामजपादी उपाय करू शकता का ?’, असे विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हो करते. तीच माझी समष्टी साधना आहे. तुम्हा सर्वांना अनेक सेवा असतात. आणखी नामजप करायचा असल्यास सांग.’’
दोन्ही संतांचे बोलणे ऐकून त्यांच्यामध्ये समष्टीविषयी असलेला भाव आणि सेवेची तळमळ माझ्या लक्षात आली. उतारवयातही समष्टीसाठी तन आणि मन यांचा त्याग करण्याची सिद्धता असलेल्या संतांच्या सत्संगात आम्हाला ठेवल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५८ वर्षे), मंगळुरू (१६.६.२०२३)