वार्तांकनाच्या माध्यमातून मनशुद्धी करून स्वतःला घडवा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ

वार्ताहर साधकाने सेवेच्या माध्यमातून स्वतःला घडवून अन्यही वार्ताहरांना घडवणे हीच खरी साधना आहे. बातम्या पाठवतांना त्या परिपूर्ण  पाठवायला हव्या. ‘मला हे जमेल का ?’, ‘मला किती सेवा आहेत ?’, अशा विचारांत न अडकता सर्वांनी मनशुद्धी करण्याचे व्रत घ्या !

प्रत्येक वार्ताहराने बातमीतून चळवळ कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत ! – श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात

प्रत्येक वार्ताहराने आपण केलेल्या बातमीतून पुढे चळवळ कशी निर्माण होईल ?, यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. यासह केवळ बातमीसाठी बातमी न करता बातमीच्या माध्यमातून आपली साधना कशी होईल ?, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

उद्या आश्विन पौर्णिमा, म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. १. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करतांना लक्षात आलेले प्रार्थनेचे महत्त्व ! १ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याची सेवा करण्यापूर्वी सामूहिक प्रार्थना करणे : ‘वर्ष २०१० मध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे … Read more

विजयादशमीचे रहस्य !

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.

दुष्टांचे दमन आणि सुष्टांचे (सज्जनांचे) संरक्षण करणारी श्री दुर्गादेवी !

‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत.

ब्रह्मदेवांची कन्या आणि शब्दब्रह्माची उत्पत्ती म्हणजे श्री शारदादेवी !

‘एकोऽहं बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे, आता मी अनंत रूपांत प्रकट होईन’, असे जे आदिस्फुरण झाले, तेच शारदेचे मूलस्वरूप आहे. त्यांनाच पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, गणेश-शारदा अशी नावे आहेत. एकत्व नष्ट न होता ही दोन रूपे झाली.

‘इतरांना जिंकण्यातील आनंद कसा द्यायचा ?’, हे शिकवणारे प.पू. डॉक्टर !

‘देवाला कुणी हरवू शकत नाही; कारण देवाचे एक एक वाक्य ही दगडावरची रेष आहे. या अज्ञानी जिवाला काही कळत नाही रे देवा !

नवदुर्गा

शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २९ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तींची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

आद्याशक्ती

नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २७ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तीची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

नवरात्र : त्यामागील शास्त्र, इतिहास, महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत

तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण, हे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी अन् महासरस्वती या देवींचे प्रधान गुण आहेत. २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशभरात चालू होत असलेल्या ‘नवरात्रारंभा’च्या निमित्ताने नवरात्रीमागील शास्त्र, नवरात्रीचे व्रत साजरे करण्याची पद्धत यांविषयीची माहिती येथे देत आहोत.