२५.९.२०२२ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांका’तील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची छायाचित्रे पाहून साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त २५.९.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक’ प्रकाशित करण्यात आला. त्यातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या छायाचित्रांकडे पाहून मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. मुखपृष्ठावरील छायाचित्र पाहून आलेली अनुभूती
१ अ. ‘चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुखपृष्ठावरील ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या छायाचित्रातील ‘त्यांच्या जोडलेल्या हाताच्या पोकळीतून चैतन्याची ज्योत निघून ते चैतन्य सर्व ठिकाणी प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
२. पृष्ठ क्र. ८ वरील छायाचित्रे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून मार्गदर्शन घेतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ हे छायाचित्र पाहून
१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बोटाने वातावरणातील गुरुतत्त्व श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना देत असून ते त्या मुठीमध्ये घेऊन जमवत आहेत’, असे मला जाणवले.
२ आ. कुटुंबियांसमवेत काढलेल्या छायाचित्रात ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या लक्ष्मीदेवीसम दिसत आहेत’, असे मला जाणवले.
३. पृष्ठ क्र. ९ वरील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधकांना मार्गदर्शन करत असतांनाचे छायाचित्र पाहून ‘त्या सरस्वतीदेवीसम दिसत आहेत’, असे मला जाणवले.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रय नारकर (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |