हिंदुस्थान हिंदूओं का’ ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही !

सांगली येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे गेली अनेक वर्षे असलेले नियमित वाचक आणि ‘श्री गजानन वीव्हिंग मिल्स् कंपाऊंड’चे श्री. रा.वि. वेलणकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना पत्र लिहिले असून ते वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

श्री. रा.वि. वेलणकर

प्रति,
समूह संपादक, दैनिक सनातन प्रभात

मी लहान असतांना बडोद्याच्या आखाड्याचे प्रवर्तक माणिकचंद हे आमच्याकडे आले होते. त्या वेळी मी रा.स्व. संघाच्या डॉ. हेडगेवार यांच्या संघाच्या शाखेमध्ये गेलो होतो, त्याची आठवण झाली. त्या वेळी ‘हिंदुस्थान हिंदूओ का, नही किसीके बाप का ?’, अशी गर्जना करणार्‍या संघाचे कार्य मी पाहिले. लहानपणी पहिल्यांदाच ‘शिवचरित्र’ माझ्या हातात पडले. त्या वेळी एक अमोल ठेवा आपल्याला सापडला, असा मला आनंद झाला होता. त्यानंतर मग ‘सनातन प्रभात’च्या कार्याचा परिचय झाला आणि व्यक्तीमत्त्व अन् भारताची शक्ती वाढवणारी ही गोष्ट आहे, हे मला पटले. आज माझ्या ज्ञानाप्रमाणे ‘हिंदुस्थान हिंदूओं का’, ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही. आमच्या वाडवडिलांनी पुष्कळ मोठा त्याग केला. पुष्कळ खोल विचार केला आणि मानव धर्माच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा कर्तव्य कल्पनांची जाणीव करून दिली. खर्‍या स्वातंत्र्याविना माणसाच्या प्रगतीचा मार्ग खुलाच होत नाही. याकरता स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे. हे पटले आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर अन् स्वामी विवेकानंद यांचे खंड वाचतांना माझ्या मनोपिंडाने आकार घेतला. ‘हिंदुस्थान हिंदूओं का’, हे ज्या दिवशी होईल, त्याच दिवशी भारताचे खरे स्वातंत्र्य प्राप्त होईल. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य आहे आणि ते कुणी अवतारी पुरुष असावेत. ते अतिशय मनाला पटणारे असे धोरण स्वीकारत आहेत आणि राहिलेल्या जगाला स्वीकारण्यास भाग पाडतील, असे वाटू लागले आहे. ‘सनातन प्रभात’चा जो प्रचाराचा मार्ग आहे, तो बरोबर आहे,’ असे पक्के वाटत आहे.  ‘जे आपल्याला पटते, ते आपल्या हातून होतेच, असे नाही. तरी ते कर्म करण्याची निश्चयशक्ती मला ईश्वराने द्यावी’, ही ईश्वराला प्रार्थना. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या यशस्वी वाटचालीसाठी पुष्कळ शुभेच्छा !

आपला,
श्री. रा.वि. वेलणकर, सांगली. (१६.१२.२०२२)