दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांना काय वाटते ?

‘संपूर्ण दैनिक म्हणजे जणू संत-सद्गुरूंचा आशीर्वाद आहे’, असे वाटते ! – मधुसूदन सोन्ना, पुणे

मी नियमित दैनिक वाचतो. आजच्या वैज्ञानिक युगात हिंदु धर्माचे आचरण कसे करायचे ? याचे अतिशय योग्य असे मार्गदर्शन दैनिकातून येते. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेची सर्व माहिती मंत्रांसह दैनिकात प्रसिद्ध केलेली असते. त्या माहितीचा लाभ होतो. त्याचसमवेत विसर्जनाचे शास्त्र समजल्यामुळे श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार विसर्जित करता आली. आपत्काळात सण कसा साजरा करायचा ? याची माहिती असते. त्यामुळे चुटपुट लागत नाही. सर्व विधी यथासांग पार पाडता येतात. प.पू. गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन असल्यामुळे सत्संग मिळाल्याचा लाभ होतो.

‘सनातन प्रभात’चा अंक घेतल्यामुळे घरातील वातावरण चांगले झाले ! – सौ. वैशाली नानासो पाटोळे, कराड, सातारा

पूर्वी घरात या ना त्या कारणाने भांडणे व्हायची. यजमानांच्या उशाखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवल्यामुळे त्यांच्यातही आता पालट झाला आहे. त्यामुळे आमच्यात भांडणे होत नाहीत. सनातनचा अंक घेतल्यामुळे आमच्या घरातील वातावरण चांगले झाले आहे. (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या घेतलेल्या वैज्ञानिक चाचणींद्वारे ‘दैनिकात सात्त्विकता आणि चैतन्य आहे’, असे सिद्ध झाले आहे. ‘दैनिक चालू केल्यापासून चांगले अनुभव येत आहेत’, असे अनेक वाचकांनी कळवले आहे. – संपादक)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु-संत यांचे विचार वाचून भावजागृती होते ! – डॉ. वैजयंती गोगावले, पुणे

दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना त्यातील आध्यात्मिक प्रयत्न आणि साधकांच्या अनुभूती यांतून पुष्कळ शिकायला मिळते. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवायला सांगतात, ते पुष्कळ चांगले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विचार वाचून भावजागृती होते.

सण साजरे करण्याची माहिती मिळाल्यामुळे सणांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येतो ! – सौ. गीतांजली जोशी, चिंचवड

दैनिक ‘सनातन प्रभात’चा ई-पेपर मी नियमित वाचते. ‘सनातन प्रभात’ वाचल्यामुळे आपल्या धर्मावर होणारे आघात कळतात. समाजात हिंदु धर्माची, हिंदु देवतांची विटंबना कशाप्रकारे केली जाते ? ते समजते. त्याचसमवेत आपण ते रोखण्यासाठी काय आणि कशाप्रकारे प्रयत्न केले पाहिजेत, हेही लक्षात येते. दुसर्‍या कोणत्याही वृत्तपत्रात याविषयी काहीच लिहिले जात नाही. आपला प्रत्येक सण, समारंभ आपल्या हिंदु पंचांगाप्रमाणे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या कशा प्रकारे साजरा केला जातो ? तो कशा प्रकारे साजरा करायला हवा ? याची संपूर्ण माहिती मिळते. ती माहिती घेऊन सण साजरे केल्यामुळे त्या त्या सणाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येतो. मन प्रसन्न आणि उत्साही होऊन आनंदाची अनुभूती घेता येते. सद्गुरु-संतांचे साधनेच्या संबंधी मार्गदर्शन करणारे लेखही प्रेरणादायी असतात. ही सर्व माहिती आणि मार्गदर्शन यांविषयी गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

अभिप्राय

दैनिक चालू केल्यापासून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्नमय वाटते. – श्री. मिलिंद देवळेकर, सातारा

मी ‘सनातन प्रभात’चे वाचन करायला लागल्यापासून माझे मन आनंदी आणि प्रसन्न रहाते.- सौ. सविता जाधव, सातारा

पुणे येथील कृतीशील वाचक श्री. जालिंदर तांबे !

श्री. जालिंदर तांबे हे दैनिकाचे वाचक असून विज्ञापने घेणे, अर्पण मिळवणे या माध्यमातून सहभागी आहेत. श्री. तांबे यांना जेव्हा ‘सनातन प्रभात’च्या वतीने संपर्क केला जातो, तेव्हा ते प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. खाऊ अर्पण घेणे, विज्ञापने घेणे, मंदिर स्वच्छता, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिज्ञा घेणे, गुरुपौर्णिमेनिमित्त समाजातून अर्पण घेणे इत्यादी उपक्रमांमध्ये ते सहभागी होतात. श्री. तांबे यांनी त्यांच्या बचत गटाची बैठक एका ठिकाणी आयोजित करून तेथे प्रवचनाचेही आयोजन केले होते. उपस्थितांना त्यांनी ‘सनातन पंचांग’ भेट म्हणून दिले.

वर्ष २०२१ मध्ये त्यांच्या आईच्या तेराव्यानिमित्त, तसेच प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तही त्यांनी सनातन संस्थेचे प्रवचन आयोजित केले. ते अनेक सेवांमध्ये पुष्कळ आनंदाने सहभागी होतात. ‘माझ्या वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी मोठ्या प्रमाणावर अल्प झाल्या आणि आनंद मिळाला’, असे त्यांनी सांगितले. ‘हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने झाले’, असे ते म्हणतात. ‘मी काहीच करत नाही, देवच सर्व करून घेत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

‘सनातन प्रभात’ नियमित वाचल्याविना चैन पडत नाही ! – कुंदन झरेकर, पुणे

‘सनातन प्रभात’ नियमित वाचल्याविना चैन पडत नाही. हिंदु धर्मावर होणारे आघात, तसेच राजकीय पक्ष काही धर्मविरोधी संघटना, धर्मद्रोही हिंदु धर्मावर करत असलेली अनाठायी टीका यांच्याविषयी माहिती मिळते आणि योग्य दृष्टीकोनही कळतो. इतर वर्तमानपत्रांत अशी माहिती नसते, तसेच आरोग्यविषयक लेखसुद्धा वाचनीय असतात, धर्मशिक्षणसुद्धा मिळते.

‘हलाल जिहाद’, ‘लँड जिहाद’ याविषयी केवळ ‘सनातन प्रभात’मधूनच वाचायला मिळते ! – चंद्रकांत कुलकर्णी, विश्रांतवाडी (चंद्रकांत कुलकर्णी हे सहा मासांपासून दैनिकाचे वाचक आहेत.)

धर्मशिक्षण, हिंदु धर्मावर होणारे आघात, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्वांविषयी केवळ ‘सनातन प्रभात’ मधूनच वाचायला मिळते. हे वाचून आम्ही कुठे कमी पडतो ? हे आम्हाला समजते. त्यामुळे ‘प्रत्येक हिंदूच्या घरात ‘सनातन प्रभात’ असावा’, असे वाटते. ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना मला चैन पडत नाही.

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे केलेल्या वैज्ञानिक चाचण्या आवडतात ! – सौ. चारूता माहुरकर, चिंचवड

दैनिकामुळे कोणत्या कृतीतून धर्मावर आघात होतात, हे समजते आणि त्या कृती टाळल्या जातात. ज्योतिषशास्त्राविषयीच्या लेखमालेतून ग्रहांमुळे आलेले दोष किंवा त्रास साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे बर्‍याच अंशी अल्प होतात, हे समजते. वाईट शक्तींचा त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय यांविषयी दैनिकात समजते. त्यामुळे आत्मबल वाढते आणि नैराश्य येत नाही.

दैनिकातील माझ्या आवडीचा भाग म्हणजे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ! ती कुठल्याही विषयाशी संबंधित असो, मला तो भाग पुष्कळ आवडतो. किती छोट्या छोट्या कृतींमधून आपण सात्त्विकता ग्रहण करू शकतो ? कुठल्या कृतींमधून रज-तम दूर करू शकतो ? हे समजते. व्यवहाराशी संबंधित असणार्‍या कृती भगवंताच्या कृपेने माझ्याकडून केल्या जातात.

सनातन प्रभात वाचायला लागल्यापासून राष्ट्रभाव निर्माण होत आहे ! – सौ. रीमा देशपांडे, चिंचवड

दैनिक ‘सनातन प्रभात’ हा परिपूर्ण अंक आहे. यामध्ये आपल्याला सर्वच माहिती मिळते. व्यवहारातील सध्या चालू असलेल्या घटना किंवा अर्थकारण, राष्ट्रधर्म आणि आध्यात्मिकदृष्ट्याही यातून आपल्याला पुष्कळ माहिती मिळते. यंदाच्या दिवाळी विशेषांकात ‘लक्ष्मीपूजन पूजाविधी’ सविस्तर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार पूजन केल्यावर घरातील सर्वांनाच आनंद मिळाला. संपादकीयच्या माध्यमातून भारताची खरी स्थिती काय आहे ? ते कळते. परमपूज्य गुरुदेवांचे तेजस्वी विचार वाचले की, आपले राष्ट्र आध्यात्मिकदृष्ट्या किती श्रेष्ठ, संपन्न आहे; मात्र सध्या ते अधोगतीला जात आहे, हे लक्षात येते. हा अंक परिपूर्ण असून त्यातून चैतन्य मिळते. अंक वाचू लागल्यापासून राष्ट्रभाव निर्माण होत आहे.

‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्मजागृती करणारे उत्तम दैनिक ! – रवींद्र कुलकर्णी, चिंचवड

‘सनातन प्रभात’ हे सनातन हिंदु धर्मजागृती करणारे एक उत्तम दैनिक आहे. हिंदु समाज कसा निद्रिस्त आणि एकत्र न येणारा, संवेदनाहीन, धर्माबद्दल उदासीन असलेला आहे ? आणि आपला हा समाज कसा जागृत करता येईल ? आणि होईल ? यासाठी निरंतर प्रयत्न करणारे हे दैनिक आहे. धर्मांतर आणि विविध प्रकारचे जिहाद यांपासून सावध कसे रहायचे ? हे शिकायला मिळते. दैनिक हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य उत्तम प्रकारे करते. सर्व हिंदु समाजाने याचा लाभ घ्यावा आणि हिंदूसंघटन वाढवावे अन् भारत देश एक हिंदु राष्ट्र म्हणून लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

‘सनातन प्रभात’ आल्यावरच हिंदु धर्माची प्रभा घरात येत आहे’, असे जाणवते ! – सौ. अस्मिता पोहरे, चिंचवड

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ घरी आल्यावरच हिंदु धर्माची प्रभा घरात येत आहे’, असे जाणवते. ‘तत्त्वनिष्ठ’ आणि ‘वस्तूनिष्ठ’ या शब्दांचा अर्थ मला हे दैनिक वाचल्यावर समजला. अन्य वर्तमानपत्रे वाचतांना मायेचे विचार असतात; मात्र ‘सनातन प्रभात’ हातात घेतल्यावर सहज नामजप चालू होतो, अशी मला अनुभूती आली आहे. प.पू. गुरुदेवांच्या धारदार लेखणीने दैनिक ‘सनातन प्रभात’ला जन्म दिला. त्यामुळे दैनिक हातात घेतल्यावर प.पू. गुरुदेवांचे दर्शन होऊन चांगले वाटते.

‘हिंदुस्थान हिंदूओ का’ ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही ! – श्री. रा.वि. वेलणकर, सांगली

श्री. रा.वि. वेलणकर, सांगली

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सांगली येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे गेली अनेक वर्षे असलेले नियमित वाचक आणि ‘श्री गजानन वीव्हिंग मिल्स् कंपाउंड’चे श्री. रा.वि. वेलणकर यांनी ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांना पत्र लिहिले असून ते वाचकांसाठी आम्ही येथे प्रसिद्ध करत आहोत !

प्रति,
श्री. नागेश गाडे, समूह संपादक, दैनिक सनातन प्रभात

मी लहान असतांना बडोद्याच्या आखाड्याचे प्रवर्तक माणिकचंद हे आमच्याकडे आले होते. त्या वेळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार यांच्या संघाच्या शाखेवर गेलो होतो, त्याची आठवण झाली. त्या वेळी ‘हिंदुस्थान हिंदूओ का, नही किसीके बाप का ?’, अशी गर्जना करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य मी पाहिले. लहानपणी पहिल्यांदाच शिवचरित्र माझ्या हातात पडले. त्या वेळी एक अमोल ठेवा आपल्याला सापडला, असा मला आनंद झाला होता. त्यानंतर मग ‘सनातन प्रभात’च्या कार्याचा परिचय झाला आणि व्यक्तीमत्त्व आणि भारताची शक्ती वाढवणारी ही गोष्ट आहे, हे मला पटले. आज माझ्या ज्ञानाप्रमाणे ‘हिंदुस्थान हिंदूओ का’, ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही. आमच्या वाडवडिलांनी पुष्कळ मोठा त्याग केला. पुष्कळ खोल विचार केला आणि मानव धर्माच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा कर्तव्य कल्पनांची जाणीव करून दिली. खर्‍या स्वातंत्र्याविना माणसाच्या प्रगतीचा मार्ग खुलाच होत नाही. याकरता स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे. हे पटले आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विवेकानंद यांचे खंड वाचायला मिळाले. त्या वाचनातच माझ्या मनोपिंडाने आकार घेतला. ‘हिंदुस्थान हिंदूओ का’, हे ज्या दिवशी होईल, त्याच दिवशी भारताचे खरे स्वातंत्र्य प्राप्त होईल. आता नरेंद्र मोदी यांचे राज्य आहे आणि ते कुणी अवतारी पुरुष असावेत. ते अतिशय मनाला पटणारे असे धोरण स्वीकारत आहेत आणि राहिलेल्या जगाला स्वीकारण्यास भाग पाडतील, असे वाटू लागले आहे. आपला जो ‘सनातन प्रभात’चा प्रचाराचा मार्ग आहे. तो बरोबर आहे. असे दिवसेंदिवस पक्के वाटू लागले आहे.

आपल्या स्वत:चा, आपल्या आत्माचा उद्धार करणे, ही पुष्कळ अवघड गोष्ट आहे. ज्यात आपले वैयक्तिक कर्तव्य, सामाजिक कर्तव्य, राष्ट्रीय कर्तव्य आणि या जीवनाचे सार्थक आहे. असे वर्तन याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जे आपल्याला पटते, ते आपल्या हातून होतेच असे नाही. तरी ते कर्म करण्याची निश्चयशक्ती मला ईश्वराने द्यावी. ही ईश्वराला प्रार्थना. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या यशस्वी वाटचालीसाठी पुष्कळ शुभेच्छा !

आपले
श्री. रा.वि. वेलणकर, सांगली.