रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘येथील सर्व साधक सकारात्मक ऊर्जेने भारलेले, शालीन, मनाने निर्मळ आणि हसतमुख आहेत. कुणाच्याही चेहर्यावर थकवा जाणवत नव्हता.
‘येथील सर्व साधक सकारात्मक ऊर्जेने भारलेले, शालीन, मनाने निर्मळ आणि हसतमुख आहेत. कुणाच्याही चेहर्यावर थकवा जाणवत नव्हता.
‘आश्रमातील सभागृहात श्रीरामाचे चित्र आहे. त्या चित्रातील श्रीराम सजीव असून ‘तो कोणत्याही क्षणी उठून उभा राहील’, असे मला वाटले. जेव्हा मी चित्रावरून दृष्टी बाजूला केली, तेव्हा मला सूक्ष्मातून रामरूपातील गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेची छायाचित्रे पहातांना ‘ते सगळे माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटले.’
रात्री मी झोपायला गेल्यावर मला झोप लागली नाही. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. काही वेळाने मला ‘माझ्या बाजूला कुणीतरी आले आहे’, असे वाटले. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझ्यासमवेत श्रीकृष्ण आहे.’
‘मी घरी असतांना आईला सेवेत साहाय्य करतो. त्या वेळी २० ते २५ मिनिटे सेवा केल्यावर मला कंटाळा येत असे; मात्र मी शाळेच्या सुटीत आश्रमात आल्यावर माझ्या क्षमतेनुसार कितीही सेवा केली, तरी मला थकवा जाणवला नाही.
नामजपाला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते. ५५ मिनिटे नामजप झाल्यानंतर मला पुष्कळ छान वाटू लागले. मला पहिल्यांदाच नामजप करतांना आणि त्यानंतर छान वाटले.
फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक ‘शिबिर’ पार पडले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा आरती करण्यापूर्वी शंखनाद केला गेला. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व देवता लगबगीने ध्यानमंदिरात उपस्थित झाल्या आहेत. सर्व देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद दिला.’
‘१.५.२०२४ ते १.६.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी आल्यावर मला स्वतःत जाणवलेले पालट येथे दिले आहेत.