रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. ज्ञानेश्वर नथु बावीस्कर, कुसुंबा, जिल्हा जळगाव.

अ. ‘मन प्रसन्न होणे, मनाला शांती लाभणे आणि नीटनेटकेपणा’, म्हणजे नेमके काय ?’, याविषयी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊनच समजले.

आ. साधकांमधील ‘मृदू बोलणे आणि इतरांचा आदर करणे’, हे गुण माझ्या लक्षात आले.

इ. मला हिंदु धर्माविषयी माहिती मिळाली.’ (१०.१.२०२५)

२. श्री. भूषण आबा पाटील, कुसुंबा, जिल्हा जळगाव. 

अ. ‘मी आजपर्यंत सनातन संस्थेच्या आश्रमाविषयी पुष्कळ ऐकले होते. आज मला प्रत्यक्षात पहायला मिळाले. मी आश्रमाविषयी जे ऐकले होते, त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने मला माहिती मिळाली.

आ. माझे मन प्रसन्न झाले.’ (१३.१.२०२५)