पू. भिडेगुरुजी यांना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना तात्काळ पदावरून हटवा !

भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.

पाद्रींचे आडनाव ‘भिडे’ किंवा ‘कुलकर्णी’ नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

सामाजिक माध्यमांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची एकच चर्चा चालू आहे त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ‘पोस्ट’ शरद पोंक्षे यांनी पोस्ट प्रसारित केली आहे.

क्रूरकर्मा टीपू सुलतान याची जयंती साजरी करणे तात्काळ बंद झाले पाहिजे ! –  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांच्या स्वतःहून हे लक्षात का येत नाही ?

टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न दिल्याने पू. संभाजी भिडेगुरुजी यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस !

‘लव्ह जिहाद’मुळे महाराष्ट्रात शेकडो हिंदु युवतींची आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत, याकडेही महिला आयोगाने लक्ष द्यावे !

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना पू. भिडे गुरुजी म्हणाले, ‘‘मी राष्ट्रहिताच्या काही सूत्रांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली; मात्र मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे.’’

‘संजीवनी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. प्रवीण कोळी यांना ‘धन्वन्तरी’ पुरस्कार प्रदान !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद !  – पू. भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे काढलेल्या दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्‍याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘हिंदवी स्वराज्याचे व्रत’ कठोरपणे पालन करणारी पिढी निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

धारकर्‍यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रबोधनापासून दूर राहून, शीलवान राहून राष्ट्रोत्कर्ष, राष्ट्रोद्धार यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजात रममाण असणारा, असे आपल्या देशाचे नाव असून त्या वृत्तीची पिढी आपल्याला निर्माण करायची आहे – पू. भिडेगुरुजी

आगरा (उत्तरप्रदेश) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून लाल किल्ल्यापर्यंत दुर्गामाता दौड

हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते.