
मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना पू. भिडे गुरुजी म्हणाले, ‘‘मी राष्ट्रहिताच्या काही सूत्रांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली; मात्र मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे.’’
मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीही पू. भिडेगुरुजी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी बोलतांना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचे होते; मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे आज वेळ काढून मी त्यांना भेटायला आलो. तसेच सरकारच्या कामागिरीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘सरकार उत्तमरित्या काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ कौतुकास्पद आहे.’’
Declare SavarkarSadan National Memorial : शासनाने ‘सावरकर सदन’ संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे !
विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्या उरूसाला अनुमती नाकारा !
छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्या निधीपेक्षाही अल्प !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन
मुली, महिला आणि बालके यांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा करा !
देशभक्त गौतम खट्टर यांची गोव्यातील अटक लज्जास्पद ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी