ठाणे येथील ऐतिहासिक नागला बंदर गड खाणमालकांकडून नामशेष ! – पुरातत्व विभाग

यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहिमेला प्रारंभ !

अशी मोहीम पोलिसांना का राबवावी लागते ? पुरातत्‍व विभाग काय करत आहे ?

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च

एकीकडे शासन यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने अवैधरित्या उत्खनन आणि बांधकाम केले जात असतांना पुरातत्व खाते त्याकडे दुर्लक्ष करते. यात शासनाचा पैसा वाया जाणार नाही का ?

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

गडदुर्गांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन- संवर्धन अधिक महत्त्वाचे ! – छत्रपती संभाजीराजे

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही राज्यातील गडदुर्गांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सर्व राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडदुर्ग यांची नावे घेतात; मात्र प्रत्यक्षात त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी कुणीच काही प्रयत्न करत नाही.

नाशिक येथील रामशेज गडावर सापडल्या ११ गुहा !

दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले.

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

रायगडासह अन्य गड-दुर्गांचे संवर्धन आणि साकारण्यात येणारे शिवसृष्टीसारखे प्रकल्प यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सिंहगडाच्या ‘कल्याण दरवाजा’ आणि परिसर संवर्धनाच्या कामास एप्रिलमध्ये प्रारंभ होईल ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गडाच्या विकासाकरता निधी संमत झाला आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ यांच्या पुढाकारातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सिंहगडावर १ एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते. गडावरील कोंढाणेश्वर मंदिर, देव टाक, अमृतेश्वर मंदिर तसेच कल्याण दरवाजा तटबंदी, हत्ती तलाव, नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक…

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन !

लोकसहभागातून दुर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.