साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाले. या भावसोहळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करत आहोत.
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाले. या भावसोहळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करत आहोत.
‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, या भजनाच्या माध्यमातून संतांनी आंतरिक गोपाळकाल्याची महती विशद करून ठेवली आहे. या भजनाच्या माध्यमातून ‘दशइंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपालकला होत असे ।।’, असे सांगितले आहे.
श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘दहीहंडी फोडणे किंवा दही, दूध आणि लोणी घेऊन जाणार्या गोपींचे मडके श्रीकृष्णाने फोडणे’, याचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना समजलेला भावार्थ !
हनुमान रामभक्तांच्या समोर नम्रपणे हात जोडून उभे रहायचे आणि असुरांच्या समोर त्यांचे महाबली रूप प्रकट व्हायचे. सध्या हनुमानाची उपासना करतांना आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
तण उगवण्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागत नाही; परंतु बाग विकसित करण्यासाठी आपल्याला कष्ट आणि नियोजन दोन्ही आवश्यक असते. त्याचप्रमाणे जीवनात तणाव दूर करून शांती प्राप्त करण्यासाठी गुणसंवर्धनाने दोष आणि अहंकार यांचे तण काढून फेकले पाहिजे.
१. ‘आपल्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती ही भगवंताची इच्छा आहे’, असे समजावे.
२. आपण संघर्षाला ईश्वराकडे घेऊन जायला हवे.
साधना आणि धर्मपालन करणार्या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे.
एकदा दैवी बालकांनी त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतील हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या विरोधातील लिखाणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माहिती दिली.
‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.