सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांची अमृतवचने !

१. मनमोकळेपणाचे महत्त्व

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

अ. ‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.

आ. ‘मन मोकळे करणे’, म्हणजे ईश्वराने सुचवलेले बोलणे आणि सांगणे होय. मन रिकामे (मोकळे) केल्यानंतरच ते शांत होते. मनमोकळेपणा, म्हणजे ‘आपल्याला जे सांगावेसे वाटत नाही’, तेच सांगायचे.

इ. मनोबलासमवेत आत्मबल वाढते.

२. स्वभावदोष आणि अहं

अ. (वाईट) सवयी मोडण्यासाठी ईश्वरासमोर ध्येय ठरवून घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करणे.

आ. स्वतःचे निरीक्षण जागृत असले पाहिजे, तरच स्वतःतील अहंचे पैलू आणि त्रुटी लक्षात येतात.

इ. जो स्वतःच्या चुका सांगतो आणि मान्य करतो, तोच ईश्वराला आवडतो अन् ईश्वर त्याचे रक्षण करतो.

ई. ‘आम्ही जे करत आहोत, ते स्वतःच्या शुद्धीसाठी आहे’, हे लक्षात घ्यावे.

(संग्राहक : कु. पूनम चौधरी, देहली (९.१.२०२१))