सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अमृतवचने !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
कु. पूनम चौधरी

१. ‘आपल्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती ही भगवंताची इच्छा आहे’, असे समजावे.

२. आपण संघर्षाला ईश्वराकडे घेऊन जायला हवे.

३. जो स्वतःचा बचाव करतो, त्याला भगवंतसुद्धा वाचवत नाही.

४. उत्तम नेतृत्व करण्यापूर्वी उत्तम साधक बनले पाहिजे.

५. स्वतःकडे तटस्थपणाने पहाणे, ही लवकर संत बनण्याची प्रक्रिया असते.

६. भाव, श्रद्धा आणि भक्ती

अ. ‘जेवढा वेळ ईश्वराची अनुभूती येते’, ती अवस्था म्हणजे ‘भाव.’

आ. ‘ईश्वर जे करेल, ते योग्यच आहे’, असे वाटणे, म्हणजे ‘श्रद्धा.’

इ. ‘ईश्वराने जे केले, ते योग्यच आहे’, असा विचार करणे, म्हणजे ‘भक्ती.’

७. महत्त्व तर भगवंतालाच आहे !

भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही सेवक ।

भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही दास ।

भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही साधक ।।

८. माझ्यासाठी गुरुचरणांविना दुसरे घर नाही.’

– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, देहली.

(संग्राहक : कु. पूनम चौधरी, देहली (९.१.२०२१))