हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी युवकांनी हनुमानाचे गुण अंगीकारावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भोपाळ (मध्यप्रदेश) – हनुमान रामभक्तांच्या समोर नम्रपणे हात जोडून उभे रहायचे आणि असुरांच्या समोर त्यांचे महाबली रूप प्रकट व्हायचे. सध्या हनुमानाची उपासना करतांना आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील ‘धर्मरक्षक’ संघटनेकडून प्रसिद्ध गुफा मंदिरामधील हनुमान मंदिरात प्रत्येक मंगळवारी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण केले जाते. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. या वेळी ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव, भाजपचे नेते श्री. अभय पंडित, समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, सनातन संस्थेच्या सौ. संध्या आगरकर यांसह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

‘धर्मरक्षक’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
हनुमान चालिसाचे पठण करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि कार्यकर्ते
हनुमान चालिसाचे पठण करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि कार्यकर्ते